Home /News /sport /

केन विल्यमसननं झळकावलं 2021 मधील पहिलं द्विशतक, स्मिथ, पुजारा, जो रुटसह अनेकांना टाकलं मागं!

केन विल्यमसननं झळकावलं 2021 मधील पहिलं द्विशतक, स्मिथ, पुजारा, जो रुटसह अनेकांना टाकलं मागं!

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टवर न्यूझीलंडनं मजबूत पकड मिळवली आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं (Kane Williamson) द्विशतक झळकावलं.

    मुंबई, 5 जानेवारी:  न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टवर न्यूझीलंडनं मजबूत पकड मिळवली आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं (Kane Williamson) द्विशतक झळकावलं. विशेष म्हणजे 2020 मधील शेवटचं द्विशतक झळकावणाऱ्या विल्यमसननं 2021 मधील पहिलं द्विशतक झळकावलं आहे. विल्यमसनचं हे टेस्ट कारकीर्दीमधील चौथं द्विशतक आहे. विल्यमननं याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), भारताचा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), इंग्लंडचा जो रुट (Joe Root) यांना मागं टाकलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) अजूनही विल्यमसनच्या बराच पुढं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान मालिकेतील ही दुसरी टेस्ट आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट न्यूझीलंडनं 101 रन्सनं जिंकली होती. त्या टेस्टमध्ये विल्यमसननं 129 रन्स केले होते. आता दुसऱ्या टेस्टमध्ये विल्यमसनच्या द्विशतकामुळे न्यूझीलंड मजबूत स्थितीमध्ये आहे. (हे वाचा-IND vs AUS: 'त्या' पाच खेळाडूंची भारताच्या माजी क्रिकेटपटूनं घेतली 'शाळा'!) केन विल्यमसननं मंगळवारी 112 रनवरुन पुढं खेळण्यास सुरु केलं. टी टाईमनंतर त्यानं द्विशतक पूर्ण केलं. त्यानं 327 बॉल्समध्ये 24 चौकारांच्या मदतीनं द्विशतक केलं. या द्विशतकासोबतच विल्यमसननं न्यूझीलंडकडून सर्वात जास्त द्विशतक करण्याच्या ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) च्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 14 दिग्गजांना टाकलं मागं टेस्ट क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकवणाऱ्या 15 जणांच्या यादीत पूर्वी विल्यमसनचा समावेश होता. स्टीव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजारा, जो रुट, अझर अली, रॉस टेलर, ख्रिस गेल, गॅरी कस्टर्न, व्हिव रिचर्ड, स्टीफन फ्लेमिंग, केविन पिटरसन, जस्टीन लँगर, सनथ जयसुर्या या दिग्गजांनी टेस्टमध्ये तीन द्विशतक झळकावली आहेत. विल्यमसननं या सर्वांना मागं टाकलं आहे. (हे वाचा-IND vs AUS: जाफरनं सिडनी टेस्टपूर्वी रहाणेला कोड्यातून दिला टीम निवडीचा सल्ला) गावसकर-मॅकलमसह 9 जणांची बरोबरी विल्यमसननं या द्विशतकासह 9 जणांची बरोबरी केली आहे. या सर्वांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 4 द्विशतक झळकावली आहे. सुनील गावसकर, ब्रँडन मॅकलम, झहीर अब्बास, मायकल क्लार्क, हाशिम अमला, ग्रेग चॅपेल, मायकल क्लार्क, मोहम्मद युसूफ, गॉर्डन ग्रिनीच आणि लेन हटन या सर्वांनी टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4 द्विशतकं झळकावली आहेत. विराट कोहली बराच पुढं! विराट कोहलीला (Virat Kohli) 2020 या वर्षात एकही शतक झळकावता आलं नाही. तरीही विराट या यादीत विल्यमसनच्या पुढं आहे. विराट कोहलीनं टेस्टमध्ये सात द्विशतक झळकावली आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 12 द्विशतकं झळकावण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या