Home /News /sport /

IND vs AUS: जाफरनं सिडनी टेस्टपूर्वी रहाणेला कोड्यातून दिला टीम निवडीचा सल्ला, तुम्हाला अर्थ सांगता येईल का?

IND vs AUS: जाफरनं सिडनी टेस्टपूर्वी रहाणेला कोड्यातून दिला टीम निवडीचा सल्ला, तुम्हाला अर्थ सांगता येईल का?

सिडनी टेस्टपूर्वी वासिम जाफरनं (Wasim Jaffer) ट्विटरवरुन टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कोड्यातून सल्ला दिला आहे.

    मुंबई, 5 जानेवारी :  भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर (Wasim Jaffer) हा त्याचे मिश्किल ट्वीट्स आणि मीमसाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधल्या रोजच्या घडामोडींवर तो ट्विटरवर त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया देत असतो. जाफरचे ट्विट्स हटके शैलीमुळे चांगलेच लोकप्रिय आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सात जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसरी टेस्ट सुरु होत आहे. या मालिकेत दोन्ही टीम्सनी एक-एक टेस्ट सध्या जिंकली आहे. त्यामुळे सिडनीमधील तिसरी टेस्ट ही मालिकेचं भवितव्य निश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. आता या टेस्टपूर्वी जाफरनं ट्विटरवरुन टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कोड्यातून सल्ला दिला आहे. जाफरनं घातलेलं हे कोडं जरा कठीण आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्स थोडे गोंधळले आहेत. (हे वाचा-IND vs AUS: 'त्या' पाच खेळाडूंची भारताच्या माजी क्रिकेटपटूनं घेतली 'शाळा'!) काय आहे जाफरचा सल्ला? वासिम जाफर त्याच्या ट्विटमधून म्हणतो, “मी आज तलावाच्या किनाऱ्यावर छान फिल्टर कॉफी घेतली. मासा पाण्याच्या आत श्वास घेऊ शकतो ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मी चे गव्हेराच्या पोट्रेट जवळून गेलो. त्या पोट्रेट जवळ मी एका जुन्या सहकाऱ्याला धडकलो. जो डोंबिवलीचा असून त्याचं बोरिवलीमध्ये रेस्टॉरंट आहे. सिडनी टेस्टसाठी गुड लक.’’ जाफरनं त्याच्या ट्विटमधून टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असावी याचा सल्ला दिला आहे. त्या ट्वीटमधील पहिल्या वाक्यावर क्रिकेट फॅन्समध्ये संभ्रम आहे. फिल्टर कॉफी या शब्दातून मयंक अग्रवाल हे नाव जाफरनं सुचवलं आहे. मयंक कर्नाटकातील बंगळुरुचा असून तेथील फिल्टर कॉफी प्रसिद्ध आहे. पाण्यातील मासा म्हणजे शुभमन गिल तर ‘चे गव्हेराचं पोट्रेट’ या शब्दामधून जाफरनं चेतेश्वर पुजाराचं नाव घेतलं आहे. डोंबिवलीचा जुना मित्र म्हणजे अजिंक्य रहाणे आणि बोरिवलीमध्ये रेस्टॉरंट याचा शब्दाचा अर्थ रोहित शर्मा असा आहे. मेलबर्न टेस्टपूर्वीही दिला होता सल्ला जाफरनं मेलबर्न टेस्टपूर्वीही रहाणेला याच प्रकारे सल्ला दिला होता. जाफरने त्यावेळी ट्वीट केलेल्या प्रत्येक ओळीतला पहिला शब्द बघितला तर तो PICK GILL AND RAHUL म्हणजेच 'गिल आणि राहुलला टीममध्ये घे' असा होता
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या