Home /News /sport /

होय, हे शक्य आहे! न्यूझीलंडच्या खेळाडूने काढले 1 बॉलमध्ये 7 रन, पाहा VIDEO

होय, हे शक्य आहे! न्यूझीलंडच्या खेळाडूने काढले 1 बॉलमध्ये 7 रन, पाहा VIDEO

कोणत्याही क्रिकेट मॅचमध्ये एका बॉलवर जास्तीत जास्त 6 रन निघू शकतात. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये बॅटरने एका बॉलवर 7 रन काढले आहेत.

    मुंबई, 9 जानेवारी : कोणत्याही क्रिकेट मॅचमध्ये एका बॉलवर जास्तीत जास्त 6 रन निघू शकतात. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला आज (रविवार) सुरूवात झाली. या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा बॅटर विल यंग (Will Young) याने एका बॉलरवर चक्क 7 रन काढले आहेत. होय, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण एखाद्या स्थानिक मॅचमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये हा प्रकार घडला आहे. न्यूझीलंडच्या इनिंगमधील 26 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशकडून इबादत हुसेन ती ओव्हर टाकत होता. तर विल यंग स्ट्राईकवर होता. इबादतच्या ओव्हरचा शेवटचा बॉल विल यंगच्या बॅटला लागून सेकंड स्लिपच्या दिशेने गेले. त्यावेळी बांगलादेशच्या फिल्डरनं त्याचा कॅच सोडला. त्याचबरोबर त्याला बॉल अडवताही आला नाही. बांगलादेशनं यंगला जीवदानाबरोबरच रन देखील दान दिले. बांगलादेशच्या फिल्डरने तो बॉल बाऊंड्री जवळ अडवला. तोपर्यंत यंगने पळत 3 रन काढले होते. त्यावेळी बॉलर एंडवर उभा असलेला नरूल हसनला थ्रो पकडता आला नाही. त्यामुळे बॉल सरळ बाऊंड्रीवर गेला. या पद्धतीने ज्या बॉलवर यंग आऊट होऊ शकला असता त्यावर त्याला 7 रन मिळाले. यंग 26 रनवरून थेट 33 वर पोहचला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बांगलादेशनं केली आहे. आता न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी सध्या सुरू असलेली दुसरी आणि शेवटची टेस्ट कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. या टेस्टमध्ये न्यूझीलंडने दमदार सुरूवात केली आहे. IND vs SA : विराट कोहलीची पत्रकार परिषदेत अनुपस्थिती, कोचना BCCI वर शंका कॅप्टन टॉम लॅथमनं (Tom Latham) यंगसोबत पहिल्या विकेटसाठी 148 रनची भागिदारी केली. यंग 54 रन काढून आऊट झाला. पण, लॅथननं दमदार शतक पूर्ण केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Live video viral, New zealand

    पुढील बातम्या