जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : विराट कोहलीची पत्रकार परिषदेत अनुपस्थिती, कोचना BCCI वर शंका

IND vs SA : विराट कोहलीची पत्रकार परिषदेत अनुपस्थिती, कोचना BCCI वर शंका

IND vs SA : विराट कोहलीची पत्रकार परिषदेत अनुपस्थिती, कोचना BCCI वर शंका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आजवर दोन टेस्ट झाल्या आहेत. टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या दरम्यान एकदाही मीडियाला सामोरा गेलेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जानेवारी : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या (India vs South Africa) दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीनं  (Virat Kohli) मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून काढून टाकल्याबद्दल मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा दावा देखील फेटाळला होता. दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर विराट आजवर एकदाही पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेला नाही. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आजवर दोन टेस्ट झाल्या आहेत. या टेस्टच्या दरम्यान केएल राहुल (KL Rahul) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मीडियाशी चर्चा केली. पण, विराट एकदाही आला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पत्रकार परिषदेला विराट अनुपस्थित असल्याचे पाहून त्याचे लहानपणीचे कोच राजकूमार शर्मा (Rajkumar Sharma) यांना आश्चर्य वाटत आहे. ‘मला या गोष्टीचे कारण समजत नाही. माझ्या मते बीसीसीआयने (BCCI) नवे नियम बनवले असतील. मीडियाशी कोण बोलणार याबाबत मीडिया मॅनेजरला अधिकार दिले असतील. ती व्यक्ती कॅप्टन जाणार की नाही, हे ठरवत असेल,’ असा दावा शर्मा यांनी ‘इंडिया न्यूज’ शी बोलताना केला आहे. ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोन्ही टेस्टपूर्वी  झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टनच्या अनुपस्थितीचे काही तरी कारण आहे. अचानक बदल का झाला ? हा बदल जाणीवपूर्वक करण्यात आला की योगायोग आहे, हे सांगणे अवघड आहे,’ असेही शर्मा यावेळी म्हणाले. भारत- वेस्ट इंडिज मालिकेवर कोरोनाचे ढग, BCCI घेणार मोठा निर्णय काय म्हणाला द्रविड? राहुल द्रविडला जोहान्सबर्ग टेस्टपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट पत्रकार परिषदेला का आला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली पुढच्या पत्रकार परिषदेला येणार आहे, असं मला सांगण्यात आल्याचं उत्तर द्रविडने दिलं. विराट त्याच्या 100 व्या टेस्टच्या (Virat Kohli 100th Test) पूर्व संध्येला मीडियासोबत बोलेल, असं मला सांगितलं गेलं आहे. तेव्हा तुम्ही विराटला प्रश्न विचारू शकता, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली होती. त्यानंतर विराट पाठदुखीमुळे जोहान्सबर्ग टेस्टमध्ये खेळलाच नाही. आता केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी तो फिट असेल अशी आशा द्रविडने व्यक्त केली आहे. केपटाऊन टेस्टपूर्वी विराट प्रेस कॉन्फरन्स घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात