Home /News /sport /

NZ vs BAN : न्यूझीलंडच्या कॅप्टनचं दमदार शतक, टीम इंडियाच्या माजी कोचची बरोबरी

NZ vs BAN : न्यूझीलंडच्या कॅप्टनचं दमदार शतक, टीम इंडियाच्या माजी कोचची बरोबरी

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची टेस्ट सुरू झाली आहे. पहिल्या टेस्टमध्ये अनपेक्षित पराभव सहन कराव्या लागलेल्या यजमान न्यूझीलंडनं दुसऱ्या टेस्टमध्ये जोरदार सुरूवात केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची टेस्ट सुरू झाली आहे. पहिल्या टेस्टमध्ये अनपेक्षित पराभव सहन कराव्या लागलेल्या यजमान न्यूझीलंडनं दुसऱ्या टेस्टमध्ये जोरदार सुरूवात केली आहे. यजमान टीमनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस फक्त 1 विकेट्सच्या मोबदल्यात 349 रन केले आहेत. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) याचे दमदार शतक हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. लॅथमनं आक्रमक खेळ करत वन-डे क्रिकेटच्या स्टाईलने 133 बॉलमध्ये शतक झळकावले. लॅथमने तीन वर्षांनी टेस्ट कारकिर्दीमध्ये शतक झळकावले आहे. त्याने यापूर्वी 2019 साली शतक झळकाले होते. लॅथमच्या कारकिर्दीमधील हे सर्वात जलद शतक आहे. हे त्याचे 12 टेस्ट शतक असून न्यूझीलंडकडून सर्वाधिक टेस्ट शतक झळकावणारा ओपनर तो बनला आहे. त्याने यावेळी न्यूझीलंडचे दिग्गज क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी कोच जॉन राईट यांची बरोबरी केली आहे. लॅथमनं शतकाच्या नंतरही धडाका सुरूच ठेवला. दिवसाच्या अखेरीस तो 186 रनवर नाबाद आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून जबरदस्त फॉर्मात असलेला डेवॉन कॉनवे (Devon Conway) 99 रनवर नाबाद आहे. कॉनवेने पहिल्या टेस्टमध्येही शतक झळकावले होते. लॅथम आणि कॉनवे जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी आत्तापर्यंत 201 रनची पार्टनरशिप केली. 780 दिवसांपासून फॅन्सना खटकत आहे गोष्ट, द्रविडच्या वाढदिवशी मिळणार गिफ्ट? न्यूझीलंडचा विल यंग (Will Young) हा एकमेव बॅटर रविवारच्या खेळात आऊट झाला. त्याने 54 रन केले. शोरिफुल इस्लामनं त्याला आऊट केले. यंग आणि लॅथमनं त्यापूर्वी पहिल्या विकेटसाठी 148 रनची भागिदारी केली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडला या सिझनमध्ये कमाल करता आलेली नाही. भारताविरुद्धची सीरिज गमावल्यानंतर बांगलादेशनं त्यांचा पहिल्या टेस्टमध्ये पराभव केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Cricket, New zealand

    पुढील बातम्या