मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 780 दिवसांपासून फॅन्सना खटकत आहे गोष्ट, द्रविडच्या वाढदिवशी मिळणार गिफ्ट?

IND vs SA : 780 दिवसांपासून फॅन्सना खटकत आहे गोष्ट, द्रविडच्या वाढदिवशी मिळणार गिफ्ट?

क्रिकेट फॅन्सना गेल्या 780 दिवसांपासून एक गोष्ट खटकत आहे. द्रविडच्या वाढदिवशी सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या टेस्टमध्ये फॅन्सची नाराजी दूर होऊन त्यांना गिफ्ट मिळणार का हा प्रश्न आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होणार आहे. तीन टेस्टची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने सेंच्युरियन टेस्ट जिंकत सुरूवात जोरदार केली होती. पण, यजमान टीमनं जोहान्सबर्ग टेस्टमध्ये 7 विकेट्सनं विजय मिळवत  बरोबरी साधली आहे. आता केपटाऊनमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये या सीरिजचा निर्णय होणार आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पाठदुखीमुळे जोहान्सबर्गमध्ये झालेली दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. विराट तिसऱ्या टेस्टमध्ये खेळेल असे संकेत टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दिले आहेत. विराटच्या पुनरागमनाने टीम इंडियाची बॅटींग मजबूत होणार असून कॅप्टन म्हणून त्याच्या अनुभवाचाही टीमला निर्णायक टेस्टमध्ये फायदा मिळणार आहे.

780 दिवसांची प्रतीक्षा

विराट कोहलीची रनमशिन अशी ओळख आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर 70 शतक झळकावत ही ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याला गेल्या दोन वर्षांमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यानं शेवटचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याच्या शतकांना ब्रेक लागला आहे. या कालवधीमध्ये त्यानं डझनभर अर्धशतक झळकावली आहेत, पण यापैकी एकाही अर्ध शतकाचं शतकामध्ये रूपांतर करणे त्याला जमले नाही.

IND vs SA : विराट कोहलीची पत्रकार परिषदेत अनुपस्थिती, कोचना BCCI वर शंका

11 जानेवारी रोजी तिसरी टेस्ट सुरू होईल त्या दिवशी विराट कोहलीनं शेवटचं शतक झळकावून आता 780 दिवस पूर्ण होतील. विराट सारख्या ऑल टाईम ग्रेट खेळाडूला शतकासाठी इतका कालावधी लागतोय ही क्रिकेट फॅन्ससाठी खटकणारी गोष्ट आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडच्या वाढदिवशीच तिसरी टेस्ट सुरू होत आहे. विराटच्या कारकिर्दीमधील ही 99 वी टेस्ट असेल. विराट द्रविडच्या वाढदिवशी सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये शतक झळकावून द्रविडसह सर्व फॅन्सना गिफ्ट देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Virat kohli