मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /One Match Wonder: पदार्पणातील टेस्टमध्ये हॅट्ट्रिक घेऊनही अवघ्या 5 मॅचमध्येच करिअर संपुष्टात!

One Match Wonder: पदार्पणातील टेस्टमध्ये हॅट्ट्रिक घेऊनही अवघ्या 5 मॅचमध्येच करिअर संपुष्टात!

काही क्रिकेटपटूंनी मोठ्या झोकात पदार्पण केलं, पण त्यांची कारकिर्द ही अगदीच अल्पजीवी ठरली. (प्रतिकात्मक फोटो)

काही क्रिकेटपटूंनी मोठ्या झोकात पदार्पण केलं, पण त्यांची कारकिर्द ही अगदीच अल्पजीवी ठरली. (प्रतिकात्मक फोटो)

One Match Wonder: काही क्रिकेटपटूंनी मोठ्या झोकात पदार्पण केलं, पण त्यांची कारकिर्द ही अगदीच अल्पजीवी ठरली.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 28 जानेवारी :  क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात काही खेळाडू चांगलेच दुर्दैवी ठरले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केल्यानंतरही काही जणांना संधी मिळाली नाही. तर, काही जणांना कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात संधी मिळाल्यानं त्याचा फायदा घेता आला नाही. काही क्रिकेटपटूंनी  मोठ्या झोकात पदार्पण  केलं, पण त्यांची कारकिर्द ही अगदीच अल्पजीवी ठरली.

  93 वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट मॅच झाली होती. या टेस्टमध्ये इंग्लंडनं फक्त तीन दिवसांमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला.  इंग्लंडच्या टीमकडून डेब्यु करणारा मॉरिस अ‍ॅलॉम हा या विजयाचा शिल्पकार ठरला होता. मॉरिसनं आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये हॅट्ट्रिक घेण्याची कमाल केली होती.

  कोणत्याही बॉलरला अशी कामगिरी करणं सहज शक्य होत नाही. कारण, सलग तीन विकेट्स घेऊन हॅट्ट्रिक मिळवणं ही कठीण कामगिरी आहे. त्यासाठी बॉलरकडे चांगलं कौशल्य आणि प्रतिभा असण्याची गरज असते. सामान्यपणे, पहिल्याच मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा बॉलर चांगली कारकीर्द घडवतो. मात्र, मॉरिस अ‍ॅलॉम याला अपवाद ठरला. त्याचं टेस्ट करिअर अवघ्या पाच मॅचमध्ये संपुष्टात आलं. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  टीम इंडिया फायनलमध्ये, सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी धुव्वा

  टेस्ट डेब्युमध्ये हॅटट्रिक

  ख्राईस्टचर्च येथे झालेली ही मॅच अनेक कारणांसाठी चर्चेत राहिली होती. या मॅचमधून न्यूझीलंडनं टेस्ट क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं आणि इंग्लंडचा मीडियम पेसर मॉरिसनं पहिल्याच वैयक्तिक मॅचमध्ये हॅटट्रिक घेत अप्रतिम कामगिरी केली होती. न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये भेदक बॉलिंग करून त्यानं आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर स्टीव्हर्ट डेम्पस्टरला बोल्ड केलं. त्यांनंतरचा बॉल डॉट गेला. पण, ओव्हरमधील शेवटच्या तीन बॉलनं इतिहास रचला. ओव्हरमधील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलवर न्यूझीलंडच्या टॉम लॉरी, केन जेम्स आणि टिच कॉर्नफोर्ड यांच्या विकेट घेतल्या. सलग तीन विकेट्स घेऊन हॅट्ट्रिक पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो 10वा बॉलर ठरला होता.

  वन मॅच वंडर

  अ‍ॅलॉमनं न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तीन विकेट्स घेतल्या. संपूर्ण मॅचमध्ये एकूण आठ विकेट्स घेऊन त्यानं इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर त्याला फारसं यश मिळालं नाही आणि अवघ्या पाच टेस्ट मॅचनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली. पहिल्या मॅचमध्ये हॅट्ट्रिक घेणारा मॉरिस 'वन मॅच वंडर' ठरला. योगायोगानं, टेस्ट क्रिकेटमध्ये अ‍ॅलॉमनं 14 रन्स केले आणि 14 विकेट्स घेतल्या.

  VIDEO:भारताची मॅच बघायला पत्नीसह पोहचला धोनी, चाहत्यांनी केलं असं स्वागत

  एकाच देशाच्या टीमचे दोन दौरे

  93 वर्षांपूर्वी झालेली ही टेस्ट मॅच आणखी एका गोष्टीमुळे विशेष ठरली होती. एकाच देशाच्या दोन क्रिकेट टीमनं एकाचवेळी जगातील दोन वेगवेगळ्या देशांचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे दोन देश टेस्ट क्रिकेटमध्ये सहभागी झाले होते. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडनं एकाचवेळी दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या टीम पाठवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजेच इंग्लंडच्या टीम एकाचवेळी जगाच्या दोन कोपऱ्यातील देशांमध्ये क्रिकेट मॅच खेळत होत्या.

  First published:

  Tags: Cricket news, England, New zealand