इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची काळजी मिटली, BCCI नं घेतला मोठा निर्णय

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची काळजी मिटली, BCCI नं घेतला मोठा निर्णय

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम 2 जून रोजी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंनी त्यापूर्वी डोस घेणं आवश्यक आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) घेतलेल्या एका निर्णयानुसार या दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंची एक मोठी काळजी कमी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मे: टीम इंडियातल्या (Team India) काही खेळाडूंनी कोरोना लशीचा (Corona vaccine) पहिला डोस घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम 2 जून रोजी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंनी त्यापूर्वी डोस घेणं आवश्यक आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) घेतलेल्या एका निर्णयानुसार या दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंची एक मोठी काळजी कमी झाली आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंची कोरोना आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR Test) घरीच होणार आहे. 'क्रिकबझनं' हे वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, बीसीसीआयचे मॅनेजर या खेळाडूंच्या घरी मेडिकल टीम पाठवणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही टेस्ट घेतली जाईल. खेळाडूंसह त्यांच्या घरच्यांचीही यावेळी टेस्ट होणार आहे. खेळाडूंचा त्रास कमी व्हावा, म्हणून बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.

स्थानिक खेळाडूंना सूट

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये दोन आठवडे क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. यामध्ये मुंबईतील खेळाडूंना एक आठवड्याची सूट देण्यात आली आहे, मात्र या कालावधीमध्ये त्यांना घराच्या बाहेर जाता येणार नाही. हे सर्व खेळाडू 18 किंवा 19 मे रोजी मुंबईत एकत्र येतील. त्यामुळे त्यांचा दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी वेळेत पूर्ण होईल.

तीन टेस्ट होणार

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी सूरु होण्यापूर्वी तीन टेस्ट होणार आहेत. त्यानंतर आयसोलेशनमध्येही त्यांच्या नियमित टेस्ट होतील. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयनं नियम आणखी कडक केले आहेत.

स्टम्पनं फटकेबाजी करणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला IPL टीम करणार मदत, कारण वाचून वाटेल अभिमान

या दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना कोरोना लशीचा पहिला डोस भारतामध्ये तर दुसरा डोस ब्रिटनमध्ये देण्यात येईल. एखादा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता येणार नाही, हे बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 9:26 AM IST

ताज्या बातम्या