मुंबई, 10 डिसेंबर : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या सुरू आहे. या टेस्टमध्ये यजमान न्यूझीलंड भक्कम स्थितीमध्ये आहे. न्यूझीलंडनं पहिली इनिंग 6 आऊट 521 रनवर घोषित केली. कॅप्टन टॉम लॅथमनं (Tom Latham) या इनिंगमध्ये द्विशतक झळकावले. त्यावे 373 बॉलमध्ये 34 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 252 रन केले. लॅथमच्या कॅप्टनसीखाली न्यूझीलंडने महिनाभरापूर्वी मुंबईत टेस्ट खेळली होती. त्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. हा माझ्या कारकिर्दीमधील सर्वात खराब काळ असल्याचे मत तेव्हा लॅथमने व्यक्त केले होते. लॅथमचं नशीब महिनाभरातच बदललं आहे . त्याने हेगले ओवल या त्याच्या होम ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वोच्च स्कोअर केला आहे.
🇳🇿 New Zealand have declared!
— ICC (@ICC) January 10, 2022
Tom Latham's brilliant 252 helps the Black Caps post a massive first innings total of 521 runs.
Watch #NZvBAN on https://t.co/WngPr0Ns1J (in selected regions) #WTC23 pic.twitter.com/239iezlSXy
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडची पहिली इनिंग 62 तर दुसरी इनिंग 167 रनवर संपुष्टात आली. न्यूझीलंडने ती टेस्ट 372 रनने गमावली होती. त्यानंतर ‘हा माझ्यासाठी सर्वात खराब काळ आहे. मला हवं तसं काही घडलं नाही.’ अशी प्रतिक्रिया लॅथमने व्यक्त केली होती. बांगलादेशनं जपली खेळ भावना, न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा केला सन्मान अजब योगायोग टॉम लॅथमच्या टेस्ट करिअरमधील हे दुसरे द्विशतक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये यापूर्वी 250 पेक्षा जास्त रन न्यूझीलंडचा नियमित कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने वेस्ट इंडिज विरुद्ध 2020 साली केले होते. विल्यमसन आणि लॅथम या दोघांनीही त्यांच्या खेळीत 34 फोर आणि 2 सिक्स लगावले आहेत. दोघांनीही सिक्स लगावत 250 रन पूर्ण केले. त्यानंतर दोघेही पुढच्याच बॉलवर आऊट झाले. दोघांनीही आऊट झाल्यानंतर बरोबर 19 बॉलनंतर इनिंग घोषित केली.