मुंबई, 20 डिसेंबर : वेस्ट इंडिज क्रिकेट टीमनं नुकताच पाकिस्तानचा दौरा (West Indies tour of Pakistan) केला. या दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या टीममध्ये कोरोना ब्लास्ट झाल्यानं त्यांना वन-डे सीरिज न खेळता परत जावं लागलं. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आणखी एका देशाची क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर केलं आहे. डिसेंबर 2022 मध्ये या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडची टीम पाकिस्तानचा दौरा करणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित (New Zealand tour to Pakistan confirmed) झाले आहे. या वेळापत्रकानुसार दोन वेळा न्यूझीलंडची टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे. सुरूवातीला डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 या कालावधीत हा दौरा असेल. या दौऱ्यात 2 टेस्ट आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका होईल. यापैकी टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( ICC World Test Championship) स्पर्धेचा भाग आहे. तर त्यानंतर पुन्हा एकदा एप्रिल 2023 मध्ये न्यूझीलंडची टीम 5 वन-डे आणि 5 टी20 सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे.
Brace yourselves! New Zealand to tour Pakistan for two Tests and three ODIs in December/January 2022-23 and will return in April 2023 for 10 white-ball matches. Exciting, right?#harhaalmaincricket pic.twitter.com/IRwgcOsYoq
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 20, 2021
पाकिस्तान आणि न्यूझीलंड देशांच्या क्रिकेट बोर्डानं अजून या दौऱ्याच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मार्च 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत 8 टेस्ट, 11 वन-डे आणि 13 टी20 सामन्यांचं यजमानपद भूषवणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांचा दौरा या काळात नियोजित आहे. आयसीसीनं 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपदही पीसीबीला दिले आहे. भुवनेश्वर कुमारनं शेअर केला मुलीचा पहिला Photo, बाबांच्या कुशीत दिसली छोटी परी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडनं पहिली वन-डे सुरू होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असतानाच पाकिस्तानचा दौरा रद्द (New Zealand abandoned Pakistan Tour) केला. पाकिस्तानमध्ये टीमच्या सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत न्यूझीलंड टीमनं हा दौरा रद्द केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या बोर्डांमधील संबंध ताणले गेले होते.