टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) त्याच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. भुवीची टीम दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी इंडियात निवड झालेली नाही. त्यामुळे तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर 24 नोव्हेंबर रोजी आई-बाबा झाले आहेत. (Bhuvneshwar Kumar/Instagram)
भुवनेश्वर कुमार आणि नुपूर यांनी त्यांच्या मुलीचा फोटो सर्वांना दाखवला आहे. पण, त्यांनी अद्याप तिचे नाव जाहीर केलेले नाही. भूवी मुलीचे नाव काय ठेवतो याची फॅन्सना उत्सुकता आहे. (Bhuvneshwar Kuma/Instagram)
भुवनेश्वर बहुतेक काळ क्रिकेटमुळे घरापासून दूर असतो. त्याला मुलीच्या जन्माची गुड न्यूज देखील फोनवरच मिळाली. भुवनेश्वरपूर्वी विराट कोहली आणि उमेश यादव हे टीम इंडियातील खेळाडू देखील यावर्षी मुलीचे बाबा बनले आहेत. (Nupur Nagar/Instagram)
विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमारच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलीचा जन्म झाला आहे. (Nupur Nagar/Instagram)
भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर हे लहानपणापासून मित्र आहेत. त्यांनी 23 नोव्हेंबर 2012 रोजी लग्न केले होते. (Nupur Nagar/Instagram)
भुवनेश्वर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या 3 मॅचच्या टी20 सीरिजमध्ये खेळला होता. त्या सीरिजमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या. (Nupur Nagar/Instagram)
न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळलेल्या टीमचा भुवनेश्वर सदस्य नव्हता. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीममध्येही त्याची निवड झालेली नाही. (Nupur Nagar/Instagram)
भुवनेश्वरचे वडील किरण पाल सिंह यांचे 20 मे रोजी निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. (Nupur Nagar/Instagram)