जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'मला एक दिवस तस्लीमा भेटल्या तर...' रागवलेल्या मोईन अलीच्या वडिलांनी दिलं उत्तर

'मला एक दिवस तस्लीमा भेटल्या तर...' रागवलेल्या मोईन अलीच्या वडिलांनी दिलं उत्तर

'मला एक दिवस तस्लीमा भेटल्या तर...' रागवलेल्या मोईन अलीच्या वडिलांनी दिलं उत्तर

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) याच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 7 एप्रिल: बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन (__Taslima Nasreen) यांनी इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) याच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या या विधानावर टीका केली होती. त्यानंतर मोईन अलीचे वडील मुनीर अली (Munir Ali) यांची देखील या विषयावर प्रतिक्रिया आली आहे. नसरीन यांच्या वक्तव्यानंतर आपल्याला अतिशय वाईट वाटलं आणि धक्का बसला अशी प्रतिक्रिया मुनील अली यांनी दिली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळणाऱ्या मोईन अलीने आपल्या जर्सीवर दारूची जाहिरात करण्यात येऊ नये, अशी विनंती चेन्नईच्या टीमला केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.  त्यावर प्रतिक्रिया देताना तस्लीमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘मोईन अली क्रिकेटमध्ये राहिला नसता, तर त्याने सिरियामध्ये जाऊन आयसिसमध्ये प्रवेश केला असता,’ असं ट्वीट तस्लीमा नसरीन यांनी केलं होतं. नसरीन यांच्या वक्तव्यावर मुनीर अली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं कि, " त्यांचं ते ‘इस्लामोफोबिक’ वक्तव्य आहे. त्यांनी आरशात पाहिलं असतं तर आपण काय वक्तव्य केलं आहे, हे त्यांना समजलं असतं.  एका मुस्लीम व्यक्तीच्या विरुद्ध केलेलं  हे टिपिकल आणि स्पष्टपणे इस्लामोफिबक वक्तव्य आहे. ज्या व्यक्तीकडं स्वत:चा आत्मसन्मान नाही तसंच त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल सन्मान नाही. अशीच व्यक्ती या स्तरापर्यंत खाली घसरु शकते," असे मुनीर अली यांनी सांगितलं. मुनीर अली पुढे म्हणाले कि, “खरं सांगायचं तर मी खूप रागात आहे. पण मला माहिती आहे की माझा राग अनावर झाला तर मी त्यांच्यासारख्या लोकांच्या हातामधील खेळणं बनेल. त्यांची कधी प्रत्यक्ष भेट झाली तर मी माझं मत त्यांना सांगेल. सध्या मी त्यांना एक शब्दकोश निवडण्याची आणि त्यामधील उपहासाचे अर्थ पाहण्याचा सल्ला देईल.” (वाचा :  धोनीच्या एका सल्ल्यानंतर करियर बदललं, नटराजननं सांगितला अनुभव ) जोफ्रा आर्चरनं दिलं उत्तर तस्लीमा नसरीन यांच्या या वक्तव्यावर इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) टीका केली. ‘तू बरी आहेस का? मला तरी तू बरी वाटत नाहीस. उपरोधिक? या ट्वीटवर कोणीही हसत नाहीये, तू देखील नाही. कमीत कमी तू हे ट्वीट डिलीट करू शकतेस,’ असं जोफ्रा आर्चर म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात