मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: धोनीच्या एका सल्ल्यानंतर करियर बदललं, नटराजननं सांगितला अनुभव

IPL 2021: धोनीच्या एका सल्ल्यानंतर करियर बदललं, नटराजननं सांगितला अनुभव

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर टी. नटराजन (T. Natrajan) याचा मागील आयपीएलपासूनचा (IPL 2020) प्रवास थक्क करणारा आहे. या सर्व प्रवासाचं श्रेय नटराजननं टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिलं आहे.

पुढे वाचा ...

चेन्नई, 7 एप्रिल: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर टी. नटराजन (T Natrajan) याचा मागील आयपीएलपासूनचा (IPL 2020) प्रवास थक्क करणारा आहे. या सर्व प्रवासाचं श्रेय नटराजननं टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिलं आहे. धोनीच्या एका सल्ल्यानंतर माझं करियर बदललं, असा अनुभव नटराजननं सांगितला आहे.

धोनीनं काय दिला होता सल्ला?

नटराजननं मागील आयपीएलमध्ये भेदक बॉलिंग करत सर्वांना प्रभावित केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं तिन्ही फॉरमॅटमध्ये (टी 20, वन-डे आणि टेस्ट) पदार्पण केलं. एकाच दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला तो पहिला भारतीय आहे. नटराजननं मागच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त 71 यॉर्कर टाकले. तसंच या यॉर्करवर त्यानं एबी डीव्हिलियर्सलाही आऊट केलं होतं.

'इएसपीएन क्रिकइन्फोला' दिलेल्या मुलाखतीमध्ये नटराजननं धोनीसोबत झालेल्या चर्चेचा अनुभव सांगितला आहे. "धोनीसारख्या खेळाडूशी चर्चा करणं ही मोठी गोष्ट आहे. त्यानं माझं मनोबल वाढवलं. तसंच माझ्याशी फिटनेसबद्दल चर्चा केली. स्लो बाऊन्सर्स आणि कटर्सचा वापर करण्याचा सल्ला धोनीनं दिला. तो सल्ला माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरला," असा अनुभव नटराजननं सांगितला आहे.

धोनीलाही केलं होतं आऊट

मागच्या आयपीएलमध्ये नटराजननं महेंद्रसिंह धोनीला देखील आऊट केलं होतं. ती विकेट देखील नटराजनला चांगलीच लक्षात आहे. "मी बॅटच्या जवळ बॉल टाकला आणि धोनीनं 102 मीटरच्या आसपास मोठा सिक्स लगावला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर धोनीला आऊट केलं. पण मी तेंव्हा आनंद साजरा केला नाही. कारण मी त्यापूर्वीच्या बॉलचाच विचार करत होतो. ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर मी आनंदी होतो. मॅच संपल्यानंतर मी धोनीशी चर्चा देखील केली,' असं नटराजननं सांगितलं.

IPL 2021: RCB च्या नव्या बॅट्समननं 49 बॉलमध्ये काढले 104 रन, विराटही प्रभावित )

आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळेच नटराजनची राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली होती. मात्र, प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्येही त्यानं चांगली कामगिरी केली होती.

First published:

Tags: Career, IPL 2021, MS Dhoni, SRH, Sunrisers hyderabad, T20 cricket, Team india