Home /News /sport /

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची 'ती' कामगिरी लज्जास्पद, प्रमुख खेळाडूचा घरचा आहेर

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची 'ती' कामगिरी लज्जास्पद, प्रमुख खेळाडूचा घरचा आहेर

अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असूनही दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करता आला नव्हता.

    मुंबई, 5 जून : अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असूनही दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करता आला नव्हता. दिल्लीला शेवटच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध विजय हवा होता. पण, तसं झालं नाही. मुंबईकडून पराभूत झाल्यानंतर दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. दिल्लीच्या कामगिरीबद्दल टीमचा प्रमुख ऑल राऊंडर मिचेल मार्शनं (Mitchell Marsh) निराशा व्यक्त केली. दिल्ली कॅपिटल्सनं 'प्ले ऑफ'मध्ये जायला हवं होतं. प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न येणं ही दिल्लीसाठी लज्जास्पद बाब आहे, असा घरचा आहेर मार्शनं दिला. रिकी पॉन्टिंगनं खेळाडूंची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली. तो कॅप्टन म्हणूनही तसंच करत असे. त्यानं मला दिल्लीसाठी एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून वागणूक दिली.' असं मार्शनं यावेळी सांगितलं. मिचेल मार्शला आयपीएल 2022 दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो काही सामने खेळू शकला नाही. कोरोनामधून बाहेर पडल्यावर त्यानं दमदार कामगिरी केली. मार्शनं आयपीएल 2022 मध्ये 8 सामन्यांत 251 रन केले. या कालावधीमध्ये त्यानं दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई इंडियन्सनं शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटने पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या या विजयामुळे दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं,  आरसीबीला(RCB) या विजयाचा फायदा झाला. त्यांनी आयपीएल प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. IND vs SA : 'रोहित शर्माला विश्रांतीची गरज नव्हती,' माजी भारतीय क्रिकेटपटूचा दावा शेवटच्या सामन्यात मुंबईने दिल्लीला 7 आऊट 159 वर रोखलं. दिल्लीने 50 रनवरच त्यांच्या 4 विकेट गमावल्या होत्या, पण ऋषभ पंत आणि रोव्हमन पॉवेलच्या पार्टनरशीपमुळे त्यांना या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. पॉवेलने 43 आणि पंतने 39 रनची खेळी केली. मुंबईकडून बुमराहला 3, रमणदीपला 2 आणि सॅम्सला एक विकेट मिळाली. दिल्लीने दिलेलं 160 रनचं आव्हान मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. मुंबईकडून इशान किशनने (Ishan Kishan) 35 बॉलमध्ये 48 रन केल्या, पण विजयाचा शिल्पकार ठरला तो टीम डेव्हिड (Tim David). त्याने 11 बॉलमध्ये 34 रनची आक्रमक खेळी केली, यात 2 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022

    पुढील बातम्या