नवी दिल्ली, 18 जून : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA T20) 5 सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन केलं आहे. भारताने विशाखापट्टणम आणि राजकोट T20I मध्ये पाहुण्या आफ्रिकन संघाचा पराभव करून मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक T20 सामना रविवारी (19 जून) बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसतील. त्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी हा सामना रंजक ठरणार आहे. चौथ्या T20 मधील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतने पाचव्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी उजव्या हाताने नाणेफेक करण्याचे संकेत दिले आहेत.
वास्तविक, पंतने असे सांगितले कारण आतापर्यंतच्या मालिकेतील चारही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा नाणेफेकीचा बॉस होता. म्हणजेच पंतने चारही वेळा नाणेफेक गमावली आहे. राजकोटमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. टीम इंडियाने दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 16.5 षटकांत 87 धावांत गारद झाला. टीम इंडियाने हा सामना 82 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी-20 मधील धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.
हे वाचा -
विराट-बाबर आता एकाच टीमकडून खेळणार! प्रत्येक वर्षी होणार सीरिज
सामना संपल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला, 'आम्ही योजना नीट अंमलात आणल्या आणि चांगले क्रिकेट खेळल्याने निकाल तुमच्या समोर आहेत. जो संघ चांगला क्रिकेट खेळतो तो सामना जिंकतो. कदाचित पुढच्या सामन्यात मी उजव्या हाताने नाणेफेक करून नाणेफेक जिंकेन. यासाठी मी सकारात्मक राहीन.
हे वाचा -
IND vs SA : ऋषभ पंतचं T20 टीममधलं स्थान पक्कं नाही, दोन खेळाडू करणार गेम ओव्हर!
दिनेश कार्तिकच्या 27 चेंडूत 55 धावा -
भारताकडून दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. सलामीवीर इशान किशनने 27 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज लुगी एन्गिडीने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. भारताकडून आवेश खानने सर्वाधिक 4 बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजांचे मनसुबे उधळून लावले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.