मुंबई, 21 मार्च : वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात ब्रिजटाऊनमध्ये झालेली दुसरी टेस्ट ड्रॉ झाली. ही टेस्ट ड्रॉ करण्यात वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्रेग ब्रेथवेटचे (Kraigg Brathwaite) महत्त्वाचे योगदान होते. पहिल्या इनिंगमध्ये 160 रन करणाऱ्या ब्रेथवेटनं दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. आता तिसरी आणि शेवटची टेस्ट 24 मार्च पासून ग्रेनेडामध्ये खेळली जाणार आहे. इंग्लंडनं वेस्ट इंडिजला विजयासाठी 282 रनचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करताना यजमान टीमनं 5 आऊट 135 रन केले. पाचव्या दिवशी यजमानांचा पराभव होईल अशी परिस्थिती होती. ब्रेथवेटनं तब्बल 4 तासांची संयमी बॅटींग करत इंग्लडला विजयापासून दूर ठेवले.
A phenomenal performance from Kraigg Brathwaite.
— ICC (@ICC) March 20, 2022
The captain faced 6️⃣7️⃣3️⃣ deliveries in the Barbados Test 😲
No West Indian has ever faced more balls in a Test match, with Brathwaite passing Brian Lara’s previous record.#WTC23 | #WIvENG pic.twitter.com/UZBUm5Gbte
ब्रेथवेटनं एकूण 16 तास क्रिजवर घालवले. या काळात त्यानं 673 बॉलचा सामना केला. या खेळीच्या दरम्यान ब्रेथवेटनं त्याच्याच टीमचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराचा (Biran Lara) 18 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. लारानं 400 रनच्या वर्ल्ड रेकॉर्ड खेळीच्या दरम्यान 582 बॉलचा सामना केला होता. लारानं तो रेकॉर्ड 2004 साली केला होता. त्यावेळी त्यानं गॅरी सोबर्स यांचा 575 बॉलचा रेकॉर्ड मोडला होता. IPL 2022 : बुमराह, चहरच नाही तर ‘हे’ 3 बॉलर्सही आहेत नव्या बॉलनं विकेट्स घेण्यात एक्स्पर्ट या टार्गेटचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अवस्था 3 आऊट 39 अशी झाली होती. या पडझडीतही ओपनिंगला आलेल्या ब्रेथवेटनं संयमी खेळी करत मॅच ड्रॉ केली. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 184 बॉलचा सामना करत नाबाद 56 रन केले. यामध्ये 4 सिक्सचा समावेश आहे. इंग्लंडकडून दुसऱ्या इनिंगमध्ये जॅक लीचनं 2 तर साकिब महमूदनंही 2 विकेट्स घेतल्या. 16 तास विक्रमी बॅटींग करणाऱ्या ब्रेथवेटला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आले.