जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : बुमराह, चहरच नाही तर 'हे' 3 बॉलर्सही आहेत नव्या बॉलनं विकेट्स घेण्यात एक्स्पर्ट

IPL 2022 : बुमराह, चहरच नाही तर 'हे' 3 बॉलर्सही आहेत नव्या बॉलनं विकेट्स घेण्यात एक्स्पर्ट

IPL 2022 : बुमराह, चहरच नाही तर 'हे' 3 बॉलर्सही आहेत नव्या बॉलनं विकेट्स घेण्यात एक्स्पर्ट

आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील 5 बॉलर्स नव्या बॉलनं विकेट्स घेण्यात एक्स्पर्ट आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील 5 बॉलर्स नव्या बॉलनं विकेट्स घेण्यात एक्स्पर्ट आहेत. दीपक चहर : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) दीपक चहर नव्या बॉलनं विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. तो सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये रन अडवण्यासोबतच विकेट्सही घेतो. सीएसकेनं चहरला 14 कोटींना खरेदी केले. चहरने आयपीएल 2021 मध्ये 15 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. तो सध्या जखमी आहे. त्यामुळे अर्धा सिझन खेळणार नाही. जसप्रीत बुमराह : यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) पहिला स्पेलही धोकादायक असतो. क्रिकेट विश्वातील अव्वल बॉलर म्हणून बुमराह प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सनं रिटेन केले आहे. त्याने अनेक मॅच मुंबईला अचूक बॉलिंगच्या जोरावर जिंकून दिल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये बुमराहनं 21 विकेट्स घेतल्या होत्या. हर्षल पटेल :  रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलमध्येही (Harshal Patel) नव्या बॉलनं विकेट्स घेण्याची क्षमता आहे. त्याने मागील आयपीएलमध्ये सर्वात जास्त 32 विकेट्स घेतल्या होत्या. आरसीबीनं त्याला 10 कोटी 75 लाख रूपयांची किंमत मोजून पुन्हा एकदा खरेदी केले आहे. KKR च्या फास्ट बॉलरनं IPL 2022 पूर्वी केलं लग्न, गर्लफ्रेंडला बनवलं जीवनसाथी आवेश खान : मागील आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला आवेश खान (Avesh Khan) यंदा लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये सर्वांनाचा प्रभावित केले होते. आवेशमध्येही नव्या बॉलनं विकेट्स घेण्याची क्षमता आहे. त्यानं मागील सिझनमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या. आवेशला लखनऊनं 10 कोटींना खरेदी केले आहे. जोश हेजलवूड : मागील आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेला हेजलवूड यंदा आरसीबीकडून खेळणार आहे. कोणत्याही ट्रॅकवर प्रभावशाली बॉलिंग करण्याची त्याची क्षमता आहे. हेजलवूडनं मागील सिझनमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. तो यंदा आरसीबीकडून नव्या बॉलनं कमाल करताना दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात