मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'खेळाडूंना हात लावण्यास बंदी, वेगळ्या गेटने प्रवेश', KKR च्या स्टारला मॅचमध्ये पाळावे लागणार कडक नियम

'खेळाडूंना हात लावण्यास बंदी, वेगळ्या गेटने प्रवेश', KKR च्या स्टारला मॅचमध्ये पाळावे लागणार कडक नियम

कोलकाता नाईट रायडर्स आणि वेस्ट इंडिजचा स्टार ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) शुक्रवारी बिग बॅश लीग स्पर्धेत (Big Bash League) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि वेस्ट इंडिजचा स्टार ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) शुक्रवारी बिग बॅश लीग स्पर्धेत (Big Bash League) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि वेस्ट इंडिजचा स्टार ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) शुक्रवारी बिग बॅश लीग स्पर्धेत (Big Bash League) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 डिसेंबर : कोलकाता नाईट रायडर्स आणि वेस्ट इंडिजचा स्टार ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) शुक्रवारी बिग बॅश लीग स्पर्धेत (Big Bash League) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रसेल मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) या टीमकडून पदार्पण करणार आहे. पण, त्याला सिडनी थंडर्सविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये अनेक कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे.

काय आहेत नियम?

रसेलला या मॅच दरम्यान टीममधील खेळाडूंना हात लावता येणार नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर त्याला वेगळ्या गेटमधून प्रवेश करावा लागेल. इतकंच नाही तर त्याची ड्रेसिंग रूम देखील इतर खेळाडूंपेक्षा वेगळी असेल. त्याला वेगळ्या डगआऊटमध्ये बसावे लागेल. त्याचबरोबर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपासून किमान दोन मीटर अंतरावर उभं राहावं लागणार आहे. रसेल टी10 लीग खेळून थेट ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत.

रसेल याच आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. तो सिडनीमध्ये फक्त 3 दिवस क्वारंटाईन होता. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार 7 दिवस आयसोलेशनमघध्ये राहणे बंधनकारक आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कठोर नियमावली तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी करणे रसेलला बंधनकारक असेल.

चार वर्षांनी पुनरागमन

आंद्रे रसेल 4 वर्षांनी बिग बॅश लीगमध्ये पुनरागमन करत आहे. तो यापूर्वी 2014 ते 2017 या कालावधीत सिडनी थंडर्स टीमचा सदस्य होता. त्याने या कालावधीत 19 मॅच खेळल्या आहेत. या मॅचमध्ये त्याने 166 च्या स्ट्राईक रेटनं 296 रन केले आहेत. याम्ये 21 सिक्सचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 23 च्या सरासरीनं 23 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

Ashes Series: इंग्लिश फॅननं ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला केलं मैदानात प्रपोज, पाहा VIDEO

आंद्रे रसेलच्या (Andre Russell) जबरदस्त खेळीमुळे डेक्कन ग्लॅडिएटर्सने (Deccan Gladiators) पहिल्यांदाच अबू धाबी टी10 लीग (Abu Dhabi T10 League) स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले आहे. आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत आणि खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रसेलनं फायनलमध्ये कमाल केली. त्यानं त्याच्या स्टाईलनं फटकेबाजी करत नाबाद  90 रन काढले. रसेलनं ही खेळी करण्यासाठी फक्त 32 बॉल घेतले. दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई करत त्यानं या खेळीत 3 फोर आणि 5 सिक्स लगावले होते. रसेलचा फायनलमधील फॉर्म ऑस्ट्रेलियातही कायम राहावा अशी मेलबर्न स्टार्स टीमची अपेक्षा असेल.

First published:

Tags: Australia, Cricket news, KKR