मुंबई, 27 मे : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा आज वाढदिवस आहे. 1980 च्या दशकात शास्त्रींची वेगळीच क्रेझ होती, हे आजच्या तरुण पिढीला फारसे माहिती नसेल.त्यावेळी शास्त्रींचे नाव काही बॉलिवूड अभिनेत्रींशी देखील जोडले गेले आहे.एकदा शास्त्री टेनिसपटू ग्रॅबियला सबातिनीला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटीनाला गेले होते.त्या काळात सबातिनी टेनिस विश्वात प्रसिद्ध होती.तिला हे समजल्यावर, ‘कोण शास्त्री?'असा प्रश्न तिने विचारला होता. त्यानंतर आपण अर्जेंटीनामध्ये वेगळ्या कामासाठी गेलो होतो, असा खुलासा शास्त्रींनी केला.
रवी शास्त्रीचे बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंहशी (Amrita Singh) असलेले अफेयर कधी लपले नाही. एका फोटोशूटच्या वेळी दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. अमृता सिंह शास्त्रीचा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट स्टेडियमवर जात असे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1986 साली साखरपुडा देखील केला. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. शास्त्रींनी 1990 साली रितूशी लग्न केले. तर अमृतानी त्यानंतर वर्षभराने 1991 साली सैफ अली खानला जोडीदार म्हणून निवडले.
‘लंचबॉक्स’ आणि ‘एअरलिफ्ट’ या गाजलेल्या चित्रपटांची अभिनेत्री निमरत कौर (Nimrat kaur) सोबत रवी शास्त्री डेट करत होते, अशा बातम्या 2018 साली आल्या होत्या. एका जर्मन कार कंपनीच्या लाँचिंगच्या दरम्यान 2015 साली दोघांची पहिली भेट झाली होती. अर्थात या दोघांनीही ही बातमी अफवा असल्याचे सांगत अफेयरची चर्चा फेटाळली.
रवी शास्त्रीने 80 टेस्ट आणि 150 वन-डे मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने यामध्ये जवळपास 7000 रन केले आणि 280 विकेट्स देखील घेतल्या आहेत. (फोटो –एएफपी)