डिप्रेशनमुळे वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटरने वडिलांनाही गमावलं; सुशांतप्रमाणेच संपवलं आयुष्य

डिप्रेशनमुळे वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटरने वडिलांनाही गमावलं; सुशांतप्रमाणेच संपवलं आयुष्य

सुशांतप्रमाणेच डिप्रेशनमध्ये असलेल्या एका क्रिकेटरनेही आपल्या आयुष्याचा शेवट केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput suicide) आत्महत्या केल्यानंतर त्याला डिप्रेशन असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त झाले. सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली. डिप्रेशनमध्ये असलेल्या सुशांतने ज्याप्रमाणे गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला, तसाच काही दिग्गज खेळाडूंनीही केला. त्यापैकीच एक म्हणजे वर्ल्ड कप विजेता क्रिकेटर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) चे वडील डेव्हिड बेअरस्टो.

जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेअरस्टोही क्रिकेटर होते. इंग्लंडसाठी ते चार टेस्ट मॅच खेळले होतं आणि यॉर्कशायरसाठी जवळपास 20 वर्षे खेळले. मात्र त्यानंतर ते डिप्रेशनमध्ये होते आणि यातूनच त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.

हे वाचा - धक्कादायक! सुशांतच्या आत्महत्येनंतर 6 तरुणांनी संपवलं आयुष्य

जॉनी बेयरस्टोने एका मुलाखतीत सांगतिलं होतं, त्याचे वडील डेव्हिड डिप्रेशनमध्ये गेले होते. ते आर्थिक अडचणीत होते. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणातही ते अडकले होते. यानंतर यॉर्कशायरच्या असोसिएशनशीदेखील त्यांचा वाद सुरू होता. 1990 साली क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ते रेडिओ कमेंटेटर बनले, मात्र तरीदेखील त्यांना त्रास होत होता. 1997 साली त्यांनी औषधांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तसं झालं नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी घरातच गळफास घेतला.

हे वाचा - Miss You: 'या' क्रिकेटपटूंनी पूर्ण केलं आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पण...

ज्यावेळी डेव्हिड यांनी आत्महत्या केली त्यावेळी जॉनी आणि त्याची बहीण लहान होते. जॉनी अवघ्या आठ वर्षांचा होता.

वडिलांच्या मृत्यूमुळे आपल्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. जेव्हा त्यांनी आत्महत्या केली तेव्हा आपण आणि आपली बहीण खूप लहान होती. वडीलांच्या मृत्यूनंतर आपणही मोठं होऊन क्रिकेटर व्हायचं असा निश्चय केल्याचं जॉनीने सांगितलं.

आज जॉनी इंग्लंड क्रिकेट टीमचा महत्त्वाचा भाग आहे. इंग्लंडचा ओपनर आणि विकेटकिपर आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - प्रत्यक्ष आयुष्यात कसा होता सुशांत सिंह राजपूत? त्याचे कधीही न पाहिलेले VIDEO

First published: June 20, 2020, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading