जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's T20 WC : मुंबईकर जेमिमाहचं अर्धशतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Women's T20 WC : मुंबईकर जेमिमाहचं अर्धशतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Women's T20 WC : मुंबईकर जेमिमाहचं अर्धशतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

ICC Women’s T20 World Cup 2023 : महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताने जेमिमाह रॉड्रीग्ज आणि रिचा घोष यांच्या खेळीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

केपटाऊन, 12 फेब्रुवारी : महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. जेमिमाह रॉड्रीग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सामना ७ विकेट राखून जिंकला. पाकिस्तानने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. सलामीच्या जोडीने ३८ धावांची भागिदारी केली. मात्र यस्तिका भाटियाला बाद करून सादिया इक्बालने जोडी फोडली. त्यानंतर नसरा संधूने शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना बाद केलं. शफालीने 25 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा केल्या. तर हरमनप्रीत कौर १२ चेंडूत 16 धावा काढून बाद झाली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रीग्जने रिचा घोषच्या साथीने विजयाच्या आशा निर्माण केल्या. जेमिमाहने चौकार मारत अर्धशतक आणि विजयही साजरा केला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 बाद 149 धावा केल्या. कर्णधार बिस्माहने अर्धशतकी खेळी केली तर चार विकेट पडल्यानंतर आयेशा नसीमने केलेल्या वेगवान खेळीमुळे पाकिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. बिस्माह आणि आयेशाने 91 धावांची भागिदारी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला भारताच्या दिप्ती शर्माने पहिला दणका दिला. दुसऱ्याच षटकात तिने सलामीवीर जावेरिया खानला हरमनप्रीतकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर मुनीबा अली आणि बिम्साह मारूफ यांनी डाव सावरला पण राधा यादवने ही जोडी फोडली. तिने मुनीबाला बाद केलं तेव्हा पाकिस्तानची अवस्था ६.५ षटकात २ बाद ४२ अशी झाली. हेही वाचा :  WPL Auction 2023 : पहिल्या WPLमध्ये होणार 409 खेळाडुंचा लिलाव, Jio Cinemaवर प्रक्षेपण आठव्या षटकात पूजा वस्त्राकारच्या गोलंदाजीवर रिचा घोषने मागे झेल घेतला. पाकिस्तानची बॅटर डार हिच्या ग्लोव्हजला नकळत लागून गेलेल्या या चेंडूवर मैदानी पंचांनी भारताचे अपील फेटाळले होते. मात्र भारताने डीआरएस घेतला आणि त्यात रिव्ह्यूमध्ये अल्ट्रा एजमध्ये चेंडू ग्लोव्हजला लागल्याचं दिसलं. तिसऱ्या पंचांनी निदा डारला झेलबाद दिलं. यामुळे पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. निदा डार बाद झाल्यानंतर सिद्रा अमीन राधा यादवच्या गोलंदाजीवर बाद झाली. तेव्हा पाकिस्तानच्या ४ बाद ६८ धावा झाल्या होत्या. यानंतर बिस्माह मारूफ आणि आयेशा नसीम यांनी फटकेबाजी करत संघाचं शतक १६ व्या षटकात धावफलकावर लावलं. भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तर शिखा पांडेसुद्धा आजच्या सामन्यात खेळणा रनाही. हरमन प्रीत, पुजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्मा यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. भारताची प्लेइंग इलेव्हन शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर,ऋचा घोष, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर, पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन जावेरिया खान, मुनीबा अली, बिस्माह मारूफ, निदा डार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयशा नसीम, फातिमा सना, ऐमन अनवर, नशरा संधू, सादिया इकबाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात