जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WPL Auction 2023 : पहिल्या WPLमध्ये होणार 409 खेळाडुंचा लिलाव, Jio Cinemaवर प्रक्षेपण

WPL Auction 2023 : पहिल्या WPLमध्ये होणार 409 खेळाडुंचा लिलाव, Jio Cinemaवर प्रक्षेपण

बीसीसआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटरवर म्हटलं की, पहिल्या WPLमध्ये संघांच्या बोलीने २००८ मध्ये पुरुषांच्या आयपीएल उद्घाटनाचे विक्रम मोडले आहेत.

बीसीसआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटरवर म्हटलं की, पहिल्या WPLमध्ये संघांच्या बोलीने २००८ मध्ये पुरुषांच्या आयपीएल उद्घाटनाचे विक्रम मोडले आहेत.

बीसीसीआय़कडून यातून 409 खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. फ्रँचाइजींना प्रत्येकी 18 खेळाडू लिलावात खरेदी करता येणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही क्रिकेटमध्ये संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आता बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केलीय. यासाठी सोमवारी 13फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावात 5 फ्रँचाइजींचा समावेश असेल. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी 13फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. यासाठी 1525 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बीसीसीआय़कडून यातून 409 खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. फ्रँचाइजींना प्रत्येकी 18 खेळाडू लिलावात खरेदी करता येणार आहेत. याचाच अर्थ लिलावात 409 पैकी 90 खेळाडुंचा लिलाव होईल. महिला प्रीमियर लीगचा पहिलाच लिलाव असल्याने याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. हेही वाचा :  Womens T20 WC : ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची विजयी सलामी, आज भारत-पाक भिडणार लिलाव प्रक्रिया मुंबईत आयोजित करण्यात आली असून सोमवारी दुपारी अडीच वाजता याला सुरुवात होईल. महिली प्रीमियर लीगच्या लिलावाचे प्रक्षेपणाचे हक्क वायकॉन 18ला विकण्यात आले आहेत. याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येईल. याशिवाय जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रिमिंगही होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात