Home /News /sport /

डिअर रेड बॉल, मला एक संधी दे! टीम इंडियाचा खेळाडू झाला भावुक

डिअर रेड बॉल, मला एक संधी दे! टीम इंडियाचा खेळाडू झाला भावुक

बीसीसीआनं (BCCI) मंगळवारी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे टीम इंडियाच्या अनुभवी बॉलरला धक्का बसला आहे. त्याने इमोशनल ट्विट करत मनातील भावना बोलून दाखवली आहे.

    मुंबई, 5 जानेवारी : टीम इंडियामध्ये काही खेळाडूंना स्थिर होण्याची संधी मिळालीच नाही. वाढत्या स्पर्धेमुळे रोज नव्या खेळाडूंचा उदय होत आहे. त्यामुळे त्यांना टीममध्ये पुन्हा जागा मिळवणे हे अवघड होत आहे. डावखुरा फास्ट बॉलर ही भारतीय क्रिकेटमधील एक दुर्मिळ प्रकार आहे. या दुर्मिळ बॉलरमध्ये जयदेव उनाडकत (Jaydev Unadkat) या अनुभवी बॉलरचा समावेश आहे. उनाडकतला टीम इंडियाकडून आजवर फक्त एकच टेस्ट मॅच खेळायला मिळाली आहे. 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये तो ही एकमेव मॅच खेळला आहे.  त्या टेस्टनंतर गेल्या 12 वर्षांपासून उनाडकत टीम इंडियातील टेस्ट टीममध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. उनाडकतनं एक ट्विट करत त्याची भावना बोलून दाखवली आहे. या ट्विटमध्ये उनाडकतच्या हातामध्ये रेड बॉल आहे. 'प्रिय रेड बॉल मला एक संधी दे, मी तुला अभिमान वाटेल असं काम करण्याचे वचन देतो.' असं ट्विट उनाडकतनं केलं आहे. काय आहे कारण? रणजी ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र टीमचा उनाडकत हा कॅप्टन आहे. बीसीसीआयनं मंगळवारीच कोरना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे रणजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे. याआधी 2021 सालचा रणजी मोसमही कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आशावादी असलेला उनाडकत निराश झाला आहे. IND vs SA : पुजारा-रहाणेसाठी निर्णयाक दिवस, चुकले तर माफी नाही! उनाडकतचा रेकॉर्ड जयदेव उनाडकतनं 2010 साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सात वन-डे आणि 10 टी 20 मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा 2018 नंतर टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. उनाडकतचा फर्स्ट क्लास आणि टी 20 क्रिकेटमध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्याने 89 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 327 तर 150 टी 20 मॅचमध्ये 182 विकेट्स घेतल्या आहेत. 2019-20 च्या रणजी सिझनमध्ये त्याने 67 विकेट्स घेतल्या होत्या. सौराष्ट्रच्या रणजी विजेतेपदाचा तो शिल्पकार होता.  उनाडकतला 2018 साली झालेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सनं 11.50 कोटी रूपयांना खरेदी केले होते. आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये चांगली किंमत मिळण्यासाठी रणजी स्पर्धा ही देखील उनाडकतसाठी संधी होती. पण, रणजी स्पर्धा स्थगित झाल्याने त्यालाही धक्का बसला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या