Home /News /sport /

IND vs SA : पुजारा-रहाणेसाठी निर्णयाक दिवस, चुकले तर माफी नाही!

IND vs SA : पुजारा-रहाणेसाठी निर्णयाक दिवस, चुकले तर माफी नाही!

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) त्यांच्यावर आता टीम इंडियासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करण्याबरोबरच आपले करिअर वाचवण्याची जबाबदारी आहे.

    मुंबई, 5 जानेवारी : टीम इंडियानं (Team India) दक्षिण आफ्रिका विरुद्ध जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) भेदक स्पेलमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa) 229 रनवर रोखले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 2 आऊट 85 रन केले आहेत. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ही अनुभवी जोडी दिवसअखेर नाबाद होती. पुजारा आणि रहाणे हे दोघेही सध्या खराब फॉर्ममुळे अडचणीत आहेत. त्यांच्यावर आता टीम इंडियासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करण्याबरोबरच आपले करिअर वाचवण्याची जबाबदारी आहे. पहिल्या इनिंगमध्ये पुजारा 3 तर रहाणे शून्यावर आऊट झाला होता. पुजाराचा वाँडर्सच्या मैदानात चांगला रेकॉर्ड आहे. त्याने इथे तीन टेस्टमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाच्या जोरावर 267 रन केले आहेत. पुजाराने  2013 साली झालेल्या टेस्टमध्ये वाँडर्सवर 153 रनची खेळी केली होती. यापूर्वी 2018 साली झालेल्या टेस्टमध्ये पुजारानं 50 रनचं योगदान देत टीम इंडियाच्या विजयात योगदान दिले होते. चेतेश्वर पुजाराला गेल्या 3 वर्षापासून एकही शतक झळकावता आलेलं नाही. हा दुष्काळ संपवण्याची त्याला संधी आहे. चौथ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 250 रनचे टार्गेट सोपे नसेल. या सीरिजमध्ये आफ्रिकेला एकदाही 250 रन करता आलेले नाहीत. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाची भिस्त ही पुजारा-रहाणे जोडीवर आहे. त्यांनी या इनिंगमध्येही निराशा केली तर त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते. डीव्हिलियर्स करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन, 2 टीममध्ये मिळणार खास भूमिका! टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुसऱ्या दिवसाचा हिरो ठरला. शार्दुलने या इनिंगमध्ये 7 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला 2 आणि जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा 229 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 27 रनची आघाडी मिळाली. भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता जोहान्सबर्ग टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भक्कम आघाडी घेत विजय मिळवण्याची संधी टीम इंडियाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, South africa, Team india

    पुढील बातम्या