मुंबई, 10 ऑक्टोबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचाच नाही तर जगातील आघाडीचा बॅटर आहे. क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात त्यानं सातत्यानं रन काढले आहेत. क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड हे विराटच्या नावावर आहेत. त्याचा एखादा रेकॉर्ड मोडला तर ती कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. टी20 क्रिकेटमधील विराटचा एक महत्त्वाचा रेकॉर्ड आयर्लंडच्या खेळाडूनं मोडला आहे.
आयर्लंडचा स्टार बॅटर पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) यानं ही कामगिरी केली आहे. विराटचा टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक फोर लगावण्याचा रेकॉर्ड त्यानं मागं टाकला आहे. आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर लगावणारा स्टर्लिंग हा बॅटर बनला आहे. त्यानं रविवारी यूएई विरुद्ध हा विक्रम केला आहे. स्टर्लिंगनं या मॅचमध्ये 35 बॉलमध्ये 40 रन काढले. या खेळीत त्यानं 4 फोर लगावले.
स्टर्लिंगचे आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 288 फोर झाले आहेत. तर विराटच्या नावावर 285 फोर आहेत. विशेष म्हणजे त्यानं ही कामगिरी विराटपेक्षा कमी मॅचमध्ये पूर्ण केलीय. विराटनं 90 मॅचमध्ये 285 फोर लगावले आहेत. तर स्टर्लिंग 89 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ही कामगिरी केली आहे.
IPL 2021: 'विराटनंतर डिविलियर्स नाही तर 'हा' तरुण भारतीय होणार RCB चा कॅप्टन'
रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर
स्टर्लिंग आणि केविन ओ ब्रायन यांच्या खेळीच्या जोरावर या मॅचमध्ये आयर्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 134 रन केले. स्टर्लिंग रोहन मुस्तफाच्या बॉलवर त्याच्याकडंच कॅच देऊन आऊट झाला. ओ ब्रायनलाही मुस्तफानं आऊट केलं.
T20 World Cup: टीम इंडियात बदल होणार का? BCCI कडून आले मोठे अपडेट
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर लगावण्याच्या यादीत स्टर्लिंग आणि विराट कोहलीनंतर मार्टिन गप्टीलचा नंबर आहे. या यादीमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या तर ऑस्ट्रेलियाच्या टी20 टीमचा कॅप्टन एरोन फिंच चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Virat kohli