मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: 'विराटनंतर डिविलियर्स नाही तर 'हा' तरुण भारतीय होणार RCB चा कॅप्टन'

IPL 2021: 'विराटनंतर डिविलियर्स नाही तर 'हा' तरुण भारतीय होणार RCB चा कॅप्टन'

आयपीएल स्पर्धेचा पुढील सिझन (IPL 2022) आणखी 6 महिने लांब आहे. तरीही त्याची फॅन्समध्ये मोठी उत्सुकता आहे. पुढील सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) कॅप्टनचाही विचार करावा लागणार आहे.

मुंबई, 10 ऑक्टोबर :  आयपीएल स्पर्धेचा पुढील सिझन (IPL 2022) आणखी 6 महिने लांब आहे. तरीही त्याची फॅन्समध्ये मोठी उत्सुकता आहे. पुढील आयपीएमलमध्ये 2 नवीन टीम सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शन (IPL 2022, Mega Auction) देखील आहे. या मेगा ऑक्शनच्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) कॅप्टनचाही विचार करावा लागणार आहे. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) या सिझननंतर टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

विराटनंतर आरसीबीचा कॅप्टन कोण होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. या पदासाठी एबी डिविलियर्सचं (AB de Villiers) नाव सर्वात आघाडीवर आहे. आयपीएल इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला डिविलियर्स गेल्या अनेक वर्षांपासून आरसीबीचा आधारस्तंभ आहे. पण, तो आता त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्याला कॅप्टन करणे ही मोठी गुंतवणूक ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आरसीबीचा माजी बॉलिंग कोच आशिष नेहरा (Ashish Nehra) यानं टीमच्या कॅप्टनपदासाठी नाव सुचवलं आहे.

2 वर्षांपूर्वीच विराटनं केला होता कॅप्टनसी सोडण्याचा विचार, टीम मॅनेजमेंटबद्दल म्हणाला...

नेहरानं 'क्रिकबझ' शी बोलताना सांगितले की, 'आरसीबीला दीर्घकाळासाठी कॅप्टन हवा असेल तर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) हा चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. फ्रँचायझीला दीर्घकाळासाठी कॅप्टन हवा असेल तर त्यांनी पडिक्कलच्या हातामध्ये टीम सोपवली पाहिजे.'

IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात!

बंगळुरुचा स्थानिक खेळाडू असलेल्या पडिक्कलचा हा दुसराच आयपीएल सिझन आहे. त्यानं आयपीएलमध्ये आजवर जोरदार कामगिरी केली आहे.  पडिक्कलनं आजवर 28 मॅचमध्ये 863 रन केले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 31.96 असून स्ट्राईक रेट 125.25 इतका आहे. त्यानं या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईत पहिलं आयपीएल शतक झळकावले होते. त्याचबरोबर त्यानं 6 अर्धशतकही झळकावली आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli