Home /News /sport /

WI vs IRE: आयर्लंडने रचला इतिहास, वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला खळबळजनक निकाल

WI vs IRE: आयर्लंडने रचला इतिहास, वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला खळबळजनक निकाल

आयर्लंडनं (Ireland) क्रिकेट विश्वातील एका खळबळजनक निकालाची नोदं केली आहो. वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये आयर्लंड क्रिकेट टीमनं यजमान टीमचा 2 विकेट्सनं पराभव केला

    मुंबई, 17 जानेवारी : आयर्लंडनं (Ireland) क्रिकेट विश्वातील एका खळबळजनक निकालाची नोदं केली आहो. वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये आयर्लंड क्रिकेट टीमनं यजमान टीमचा 2 विकेट्सनं पराभव केला. त्याचबरोबर तीन वन-डे सामन्यांची मालिका 2-1 या फरकाने जिंकली. आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य टीमविरुद्ध त्यांच्या देशात आयर्लंडनं पहिल्यांदाच मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयर्लंडनं पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या वेस्ट इंडिजला 212 रनमध्येच रोखले. त्यानंतर 213 रनचे आव्हान 2 विकेट्स आणि 31 बॉल राखत पूर्ण केले. अँडी मॅक्ब्राईन (Andy Mcbrine) या विजयाचा हिरो ठरला. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीमध्येही दमदार कामगिरी केली. अँडीने पहिल्यांदा स्पिन बॉलिंगवर वेस्ट इंडिजला नाचवले. त्याने 10 ओव्हर्समध्ये फक्त 28 रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 59 रनची निर्णायक खेळी करत टीमला हा ऐतहासिक विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. अँडीला 'प्लेयर ऑफ द मॅच' आणि 'प्लेयर ऑफ द सीरिज' या दोन्ही पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने या 3 सामन्यांच्या मालिकेत 128 रन काढले तसंच 10 विकेट्स घेतल्या. यजमान वेस्ट इंडिजने सुरूवाात चांगली केली होती. शाही होप आणि जस्टीन ग्रीव या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 72 रनची भागिदारी केली. त्यानंतर वेस्ट इंडिजची मिडल ऑर्डर कोसळली. निकोलस पूरन (2), शमराह ब्रूक्स (1) आणि कॅप्टन कायरन पोलार्ड (3) रन काढून झटपट आऊट झाले. IND vs SA : टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिकेच्या कॅप्टननं चोळलं मीठ, वन-डे मालिकेपूर्वी दिला इशारा जेसन होल्डर, अकील हुसेन आणि ओडिन स्मिथ यांनी प्रतिकार केल्यानं वेस्ट इंडिजचा स्कोअर 200 च्या पार जाऊ शकला. होल्डरने 60 बॉलमध्ये 44 रन काढले. अकीलनं 23 तर स्मिथनं नाबाद 20 रनची खेळी केली. पण, त्यानंतर आयर्लंडनं निर्धारानं बॅटींग करत वेस्ट इंडिजला पराभूत केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, West indies

    पुढील बातम्या