जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिकेच्या कॅप्टननं चोळलं मीठ, वन-डे मालिकेपूर्वी दिला इशारा

IND vs SA : टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिकेच्या कॅप्टननं चोळलं मीठ, वन-डे मालिकेपूर्वी दिला इशारा

IND vs SA : टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिकेच्या कॅप्टननं चोळलं मीठ, वन-डे मालिकेपूर्वी दिला इशारा

दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्धची कसोटी मालिका (India vs South Africa) जिंकत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पराभवानंतर बॅक फुटवर गेलेल्या टीम इंडियाच्या जखमेवर दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टननं मीठ चोळलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला विजयाचे दावेदार मानले जात होते.  प्रत्यक्षात यजमान दक्षिण आफ्रिकेनं ही मालिका जिंकत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पराभवानंतर बॅक फुटवर गेलेल्या टीम इंडियाच्या जखमेवर दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टननं मीठ चोळलं आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2018 साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी झालेली वन-डे मालिका भारतीय टीमने 5-1 या फरकाने जिंकली होती. या इतिहासानंतरही दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावूमा (Temba Bavuma) याचा आत्मविश्वास सध्या वाढला आहे. तर टीम इंडियात अनेक उलथापालथी सध्या सुरू आहेत. विराट कोहलीनं या पराभवानंतर टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली आहे. केएल राहुल (KL Rahul) पहिल्यांदाच एखाद्या वन-डे मालिकेत टीम इंडियाची कॅप्टनसी करणार आहे. बावूमाने सांगितले की, ‘आम्ही 2018 साली काय झाले त्याची काळजी करत नाही.  आमच्या पद्धतीने खेळण्याचा आणि योग्य रणनीतीची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. भारताविरुद्ध वन-डे मध्ये विजय मिळवल्यास टीमच्या आत्मविश्वासात भर पडेल. त्याचा फायदा आगामी काळात टीमला होईल. व्हाईट बॉल क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेच्या टीमबद्दलचे लोकांचे मत आता बदलत आहे. यापूर्वी आम्ही स्पिन बॉलिंगचा सामना करू शकत नाही, असे म्हंटले जात असे. आम्ही विदेशातील पिचवर संघर्ष देखील केला होता. पण, टी20 वर्ल्ड कपमध्ये आम्ही अनेकांना चुकीचे ठरवले आहे. ’ असे त्याने सांगितले. मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) दक्षिण आफ्रिकेने 5 पैकी 4 सामने जिंकले होते. मात्र रनरेटच्या फरकामुळे त्यांना सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. ‘विराट कोहलीला आता बदलावं लागेल’, कपिल देव यांचे परखड बोल आमच्या टी20 टीमने वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीतून शिकले पाहिजे. त्या टीमने निकालांची जास्त पर्वा केली नाही. तर त्या पद्धतीवर लक्ष केंद्रीत केले होते, ’ असे बावूमा यावेळी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात