मुंबई, 30 जानेवारी : आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. यश ढूलच्या (Yash Dhull) कॅप्टनसीमधील टीम इंडियानं या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या वर्ल्ड कपमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्व आयपीएल टीमचं विशेष लक्ष आहे. त्यांना घेण्यासाठी त्यांच्यात जोरदार चुरस रंगणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमधील भारतीय फास्ट बॉलर राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याला चांगली बोली लागेल, असं भविष्य टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) व्यक्त केलं आहे. अश्विननं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर हे भविष्य व्यक्त केलं आहे. ‘राजवर्धनची आयपीएलमध्ये नक्की निवड होईल. कोणती टीम त्याला खरेदी करेल हे सांगता येणार नाही. पण, त्याच्यासाठी नक्की बोली लागेल. तो राईट आर्म फास्ट बॉलर आहे जो चांगले इनस्विंग टाकतो. टीम इंडियामध्ये फक्त इशांत शर्मा (Ishant Sharma) हा एकमेव राईट आर्म फास्ट बॉलर आहे, ज्याच्यामध्ये ही कला आहे. त्यामुळे माझ्या मते त्याला आयपीएल लिलावात चांगली मागणी असेल. तसेच तो लोअर ऑर्डरमध्ये आक्रमक बॅटींग देखील करतो,’ याकडेही अश्विनने लक्ष वेधले. अंडर 19 टीमचा कॅप्टन यश ढूल हा देखील अतिशय गुणवान क्रिकेटपटू आहे. मागील अंडर 19 टीमचा कॅप्टन प्रियम गर्गला सनरायझर्स हैदराबादनं खरेदी कले होते. ते यंदाही तसेच करणार का हे पाहावं लागेल.’ यशला कोरोनामुळे या वर्ल्ड कपमधील 2 सामने खेळता आले नाहीत. त्याचे बांगलादेश विरूद्ध टीममध्ये पुनरागमन झाले. या मॅचमध्ये त्यानं निर्णायक क्षणी शांतपणे एक बाजू लावून धरत टीमला विजय मिळवून दिला. Legends League 2022 : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची फटकेबाजी, वर्ल्ड जायंट्स टीम चॅम्पियन अंडर-19 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये (U19 World Cup Quarter Final) भारताने बांगलादेशाला (India vs Bangladesh) सातवे आस्मान दाखवत दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 5 विकेट राखून बांग्लादेशवर विजय मिळवला. बांगलादेशनं दिलेलं 112 रनचे आव्हान टीम इंडियानं 30.5 ओव्हर्समध्येच पूर्ण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.