जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Legends League 2022 : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची फटकेबाजी, वर्ल्ड जायंट्स टीम चॅम्पियन

Legends League 2022 : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची फटकेबाजी, वर्ल्ड जायंट्स टीम चॅम्पियन

Legends League 2022 : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची फटकेबाजी, वर्ल्ड जायंट्स टीम चॅम्पियन

मस्कतमध्ये झालेल्या निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेटला (Legends League Cricket) चॅम्पियन मिळाला आहे.मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी खेळाडू या विजयाचा शिल्पकार ठरला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : मस्कतमध्ये झालेल्या निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेटला (Legends League Cricket) चॅम्पियन मिळाला आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये वर्ल्ड जायंट्सनं आशिया लॉयन्सचा (World Giants vs Asia Lions) 25 रननं पराभव केला. जायंट्सनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 256 रन केले होते. त्याला उत्तर देताना आशिया लॉयन्सनं 8 आऊट 231 पर्यंत मजल मारली. पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या जायंट्स टीमनं आक्रमक खेळ केला. विशेषत: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून आयपीएलमध्ये खेळलेला न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर कोरे अँडरसननं (Corey Anderson) फायनलमध्ये वादळी बॅटींग केली. त्याच्यापुढे लॉयन्सचा एकही खेळाडू टिकला नाही. त्याचबरोबर केविन पीटरसननंही दमदार खेळी केली. पीटरसननं शोएब अख्तरच्या एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावले. त्याने 22 बॉलमध्ये 5 सिक्सच्या मदतीनं 48 रन केले. पीटरसन आऊट झाल्यानंतरही जायंट्सच्या इनिंगला ब्रेक लागला नाही. वन-डे क्रिकेटमध्ये एकेकाळी सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या अँडरसनंच शतक फक्त 7 रननं हुकलं. त्यानं आऊट होण्यापूर्वी 43 बॉलमध्ये 8 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीनं 93 रन काढले. जायंट्सचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं  17 बॉलमध्ये 38 रनची खेळी करत टीमचा स्कोअर 256 पर्यंत नेला. ENG vs WI : धोनीच्या सहकाऱ्यानं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल, टीमला जिंकून दिली मॅच त्याला उत्तर देताना लायन्सकडून जयसूर्या (38) आणि मोहम्मद युसूफनं (नाबाद 39) असे सर्वात जास्त रन केले टीमच्या 6 खेळाडूंनी 20 पेक्षा जास्त रन केले. पण, एकाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने लॉयन्सचा पराभव झाला. कोरे अँडरसनला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ तर मोर्ने मॉर्केलला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्कार देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात