मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021: लिलावादरम्यान ‘या’ नियमांची घ्यावी लागणार सर्व फ्रँचायझींना काळजी

IPL Auction 2021: लिलावादरम्यान ‘या’ नियमांची घ्यावी लागणार सर्व फ्रँचायझींना काळजी

Indian Premier League Players Auctions 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनसाठी (IPL 2021) गुरुवारी चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावादरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) जारी केलेल्या काही गाईडलाईन्सचं सर्व फ्रँचायझींना पालन करावं लागणार आहे.

पुढे वाचा ...

चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनसाठी (IPL 2021) गुरुवारी चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. आठ टीममधील 61 रिक्त जागांसाठी हा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी (News 18 lokmat Live IPL auction Updates) 164 भारतीय, 125 विदेशी आणि 3 असोसिएट देशांच्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

लिलावाच्या दरम्यान कोणत्या खेळाडूला सर्वात जास्त बोली लागली? कोणत्या खेळाडूला कोणत्या टीमनं खरेदी केलं? कोणते खेळाडू अनसोल्ड ठरले याकडे सर्वांचं लक्ष असतं. त्याचबरोबर या लिलावादरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) जारी केलेल्या काही गाईडलाईन्सचं सर्व फ्रँचायझींना पालन करावं लागणार आहे.

कमाल खर्चावर मर्यादा

लिलावादरम्यान कोणतीही फ्रँचायझी त्यांच्या शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम वापरता येणार नाही. प्रत्येक फ्रँचायझीला खेळाडू खरेदी करण्यासाठी 85 कोटी ही कमाल रक्कम आहे. यंदाच्या लिलावासाठी पंजाब किंग्सकडं सर्वात जास्त 53.2 कोटी रुपये आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडं सर्वात कमी 10.75 कोटी रुपये आहेत.

(हे वाचा- IPL Auction 2021 : कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार लिलाव? वाचा सगळे अपडेट एका क्लिकवर)

किमान 75 टक्के खर्च करणे आवश्यक

प्रत्येक फ्रँचायझींसाठी असलेल्या 85 कोटी रुपयांपैकी त्यांना किमान 75 टक्के रक्कम खर्च करावी लागेल. एखाद्या फ्रँचायझीनं 70 टक्के रकमेतच सर्व खेळाडू खरेदी केले तर त्यांची उरलेली पाच टक्के रक्कम ही बीसीसीआयच्या खात्यात जमा होईल.

‘राईट टू मॅच’ पर्याय नाही

यंदा खेळाडूंचे मिनी ऑक्शन आहे. त्यामुळे आयपीएल 2021 साठी खेळाडूंना आपल्याकडं ठेवण्यासाठी फ्रँचायझींना राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरता येणार नाही. फ्रँचायझी फक्त मेगा ऑक्शनमध्ये या कार्डचा वापर करु शकतात.

(हे वाचा-या हंगामात बोली लागणं महत्त्वाचं, अन्यथा या 5 खेळाडूंचा 'खेळ' होणार खल्लास)

या कार्डचा वापर करुन एखाद्या फ्रँचायझीला त्यांनी रिलीज केलेला खेळाडू पुन्हा हवा असेल तर त्याला लिलावात वापरली जाणारी सर्वात मोठी रक्कम देऊन आपल्याकडे कायम ठेवता येतो. याचा वापर करत फ्रँचायझी आपला कोणताही जुना खेळाडू परत मिळवू शकते. यंदा मात्र ही सुविधा नसणार आहे.

खेळाडूंची कमाल आणि किमान मर्यादा निश्चित

बीसीसीआयनं प्रत्येक टीमसाठी खेळाडूंची कमाल आणि किमान मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त 25 तर कमीत कमी 18 खेळाडूंचा टीममध्ये समावेश करु शकते. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडं (RCB) सध्या सर्वात जास्त 11 तर सनरायझर्स हैदराबादकडं सर्वात कमी 3 जागा शिल्लक आहेत.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket news, Franchise, India vs england, IPL 2021, Ipl 2021 auction, Rules, Sports