मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Auction 2021 : कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार लिलाव? वाचा सगळे अपडेट एका क्लिकवर

IPL Auction 2021 : कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार लिलाव? वाचा सगळे अपडेट एका क्लिकवर

Indian Premier League Players Auctions 2021: आयपीएल 2021 साठीचा (IPL Auction 2021) लिलाव भारतीय प्रमाणवेळेनुसार 18 फेब्रुवारी 2021, गुरुवारी दुपारी 3 वाजता सुरु होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  News18 Desk
चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) साठी खेळाडूंचा लिलाव गुरुवारी होणार आहे. या लिलावात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सर्व आठ आयपीएल टीम सहभागी होणार आहेत. या सीझनसाठी 292 खेळाडूंचा यंदा लिलाव होणार आहे. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे. यंदा ही भारतामध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) नं अजून या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. भारत-इंग्लंड मालिका 28 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात ही स्पर्धा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आयपीएल स्पर्धेपूर्वी खेळाडूंना ब्रेक देण्याची मागणी केली आहे. (हे वाचा : IPL 2021: मुंबई इंडियन्सकडे परतणार 'भज्जी'? या तीन फ्रेंचायझी बोली लावण्याची शक्यता ) आयपीएल लिलाव कधी सुरु होणार? आयपीएल 2021 साठीचा लिलाव भारतीय प्रमाणवेळेनुसार 18 फेब्रुवारी 2021, गुरुवारी दुपारी 3 वाजता सुरु होण्याची शक्यता आहे. हा लिलाव टीव्हीवर कुठे पाहता येईल? आयपीएल 2021 सिझनपूर्वी होणारा खेळाडूंचा लिलाव स्टार स्पोर्ट्सच्या सर्व वाहिन्यांवर पाहता येईल. (हे वाचा : IPL Auction 2021: लिलावाच्या काही तासांपूर्वी CSK च्या 'या' माजी खेळाडूची माघार! ) व्हिवो आयपीएल 2021 लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? व्हिवो आयपीएल 2021 लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+ हॉटस्टारवर पाहता येईल. त्याचबरोबर तुम्ही या लिलावाचे सर्व लाईव्ह अपडेट्स https://lokmat.news18.com/ वर देखील ( News 18 lokmat Live IPL auction Updates) पाहू शकता. तसेच हा लिलाव जियो टीव्हीच्या मोबाईल अ‍ॅपवरही पाहता येईल.
First published:

Tags: Cricket news, IPL 2021, Ipl 2021 auction

पुढील बातम्या