हरभजन सिंग- 2020 मध्ये हरभजन काही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. त्याचा चेन्नईबरोबरचा करारही यावर्षी संपला आहे. आयपीएल 2021 लिलावासाठी त्याने त्याचे बेस प्राइस 2 कोटी निश्चित केली आहे. जर एखाद्या फ्रेंचायझीने त्याला संघात घेतलं नाही तर त्याच्याकडे निवृत्तीशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही
मोहित शर्मा- गेल्यावर्षी दिल्लीकडून खेळलेल्या या खेळाडूला विशेष संधी मिळाली नव्हती. आयपीएलमध्ये 2013 मध्ये डेब्यू करणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत 86 सामने खेळले असून यात त्याने 92 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी त्याने 2015 नंतर एकही मॅच खेळली नाही आहे. त्यामुळे एकाही संघाने बोली न लावल्यास या खेळाडूसमोर निवृत्तीचा पर्याय शिल्लक राहील.