मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केलाय. आता एलिमेनेटरमध्ये त्यांची लढत लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. या सिझनपूर्वी विराट कोहलीनं (Virat Kohli) आरसीबीची कॅप्टनसी सोडली असून फाफ डुप्लेसी (Faf du Plessis) आता आरसीबीचा कॅप्टन आहे. आरसीबीकडून पहिल्यांदा खेळणाऱ्या फाफच्या खेळावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) चांगलाच खूश झालाय.
सेहवागनं विराट आणि फाफच्या कॅप्टनसीची तुलना करत आरसीबीमधील फरक सांगितला आहे. आरसीबीच्या यशाचं श्रेय विराटनं त्यांचा नवा कोच संजय बांगर आणि फाफ डुप्लेसिसला दिलं आहे. सेहवागनं यावेळी सांगितलं की, 'नवा कोच संजय बांगर आणि नवा कॅप्टन फाफ डुप्लेसिस आल्यानंतर आरसीबीची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. यापूर्वी विराट कोहली 2-3 मॅच खराब खेळलेल्या खेळाडूला टीममधून वगळत असे, पण बांगर आणि डुप्लेसिसनं तसं केलेलं नाही. त्यांनी टीममध्ये फार बदल केले नाहीत. फक्त अनुज रावतच्या जागी पाटीदारचा समावेश केलाय. अन्य कोणत्याही खेळाडूला त्यांनी बदललेलं नाही.'
सेहवागनं पुढे सांगितलं की, 'या सिझनमध्ये फाफच्या जागी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला कॅप्टन केलं असतं तर त्यानं दबावामध्ये विराटचं ऐकलं असतं. पण फाफ आल्यानंतर असं झालेलं नाही. संजय बांगरनं यापूर्वी विराटसोबत काम केलं आहे. त्यामुळे तो त्याच्याबरोबर चर्चा करू शकतो.'
Women's T20 Challenge : नाशिकच्या मायाची विचित्र बॉलिंग अॅक्शन Viral, फॅन्सना आठवला पॉल अॅडम्स
आरसीबीरकडून फाफ डुप्लेसी (Faf du Plessis) कॅप्टनसीसह बॅटींगमध्येही यशस्वी ठरला आहे. त्यानं आत्तापर्यंत 14 सामन्यात 443 रन केले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 96 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. फाफनं लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या मॅचमध्ये 96 रनची खेळी केली होती. त्यामुळे आता एलिमेनेटरमध्येही त्याच्याकडून याच प्रकारच्या खेळीची आरसीबीला अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli, Virender sehwag