मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) धामधुमीमध्येच महिला क्रिकेटपटूंची टी20 चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धा सुरू आहे. व्हेलॉसिटी विरूद्ध सुपरनोवाज (Velocity vs Supernovas) या टीममध्ये बुधवारी या स्पर्धेतील दुसरा सामना झाला. शफाली वर्माच्या (Shafali Varma) आक्रमक अर्धशतकामुळे व्हेलॉसिटीनं हा सामना जिंकला. सुपरनोवाजची कॅप्टन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) देखील अर्धशतक झळकावलं. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरी इतकीच चर्चा नाशिकची 23 वर्षांची लेग स्पिनर माया सोनावणेची (Maya Sonawane) झाली. व्हेलॉसिटीकडून खेळणाऱ्या मायाची बॉलिंग अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल अॅडम्स (Paul Adams) आणि गुजरात लॉयन्सकडून आयपीएल खेळलेल्या शिविल कौशिक (Shivil Kaushik) यांच्या सारखी आहे. हे दोघंही त्यांच्या विचित्र बॉलिंगच्या शैलीमुळे ओळखले जात. महिलांच्या क्रिकेटमध्ये ही शैली पहिल्यांदाच दिसली. त्यामुळे मायाची बॉलिंग अॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
Finally seeing Maya Sonawane live. Heard good things about her.. Had a good Senio Women's T20 League too, taking six wickets in 11 overs.
— Rohit Sankar (@imRohit_SN) May 24, 2022
Proper frog in a blender stuff...#WomensT20Challenge #My11CircleWT20C pic.twitter.com/F132CVucuM
What do you make of these alien bowling actions of Maya Sonawane and our very own Kevin Koththigoda 🤔 🤔#My11CircleWT20C #SNOvVEL #mystrey #ipl2022 pic.twitter.com/SJsvPOoWBV
— Amila Kalugalage (@akalugalage) May 24, 2022
कोण आहे माया? माया सोनावनेची ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नरची आहे. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या मायाची टी20 चॅलेंज स्पर्धेतील पहिलीच मॅच होती. या स्पर्धेत खेळणारी ती आठवी अनकॅप भारतीय बनली आहे. यापूर्वी तिनं सिनिअर टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्या स्पर्धेतील 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या. बुधवारी तिला टी20 चॅलेंजमध्ये कमाल करता आली नाही. मायानं 2 ओव्हर्समध्ये 19 रन दिले आणि तिला एकही विकेट मिळाली नाही. IPL 2022, LSG vs RCB Dream 11: ‘करो वा मरो’ लढतीत, ‘या’ खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश दिप्ती शर्मा कॅप्टन असलेल्या व्हेलॉसिटीनं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. हरमनप्रीत कौरच्या 51 बॉल 71 रनच्या जोरावर सुपरनोवाजनं पहिल्यांदा बॅटींग करत 5 आऊट 150 रन केले. व्हेलोसिटीनं 151 रनचं टार्गेट 10 बॉल आणि 7 विकेट्स राखत पूर्ण केलं. दीप्ती शर्मा आणि वुडलाईट जोडीनं नाबाद 71 रनची भागिदारी करत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. व्हेलॉसिटीकडून शफाली वर्मानं 33 बॉलमध्ये 51 रनची वादळी खेली केली.