मुंबई, 13 जानेवारी : आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात लोकप्रिय लीग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक ब्रँड म्हणून आयपीएलचा भाव वधारला आहे. गेल्या वर्षी 25 ऑक्टोबर रोजी दोन नव्या टीमची घोषणा झाली, त्यावेळी हे सिद्ध झाले. लखनऊ या शहराच्या नव्या टीमला तब्बल 7090 कोटी रूपयांना खरेदी करण्यात आले आहे. आता आयपीएलमधील दोन टीमनी मोठी भरारी घेतली आहे. या टीमनी 2021 मध्ये जगभरातील सोशल मीडियावरील टॉप टेन टीममध्ये जागा मिळवली आहे. जगभरातील टॉप टेन लोकप्रिय टीममध्ये प्रामुख्याने फुटबॉल क्लब आहेत. त्या टीमच्या रांगेत आयपीएलमधील 2 टीमचा समावेश झाला आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या टीमनी या यादीत जागा मिळवली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) लोकप्रियतेमध्ये मागे टाकत आघाडी घेतली आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या वर्षातील ही यादी आहे. या यादीमध्ये 820 मिलियन (82 कोटी) एंगेजमेंट्ससह आरसीबी आठव्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स 752 मिलियन (75.2 कोटी) एंगेजमेंटसह नवव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीप्रमाणेच मँचेस्टर युनायटेड 2.6 बिलियन एंगेजमेंटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर स्पेनमधील फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोना, रियाल माद्रीद, लियोनेल मेस्सीचा फ्रान्समधील कल्ब पीएसजी तसेच चेल्सी एफसी या टीमचा सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय टीममध्ये समावेश आहे.
United, United top of the league - of total engagement on social media. Maybe no more need for the sentiment graphs pic.twitter.com/fL2p834UdM
— Samuel Luckhurst (@samuelluckhurst) January 7, 2022
आरसीबी आणि सीएसके या आयपीएल टीमचा 2021 साली यू ट्यूब (YouTube) वरील टॉप 10 लोकप्रिय टीममध्येही समावेश आहे. आरसीबी 165 मिलियन (16.5 कोटी) इंटरॅक्शनसह सातव्या नंबरवर आहे. तर सीएसकेने 141 मिलियन (14.1 कोटी) इंटरॅक्शनसह दहावा क्रमांक पटकावला आहे. यू ट्यूबवर बार्सिलोना सर्वात लोकप्रिय टीम आहे. तर मँचेस्टर युनायटेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. IND vs SA : टीम इंडियाचा Success Mantra, कॅप्टनच्या इशाऱ्यानंतर खेळाडूंनी केले काम! VIDEO