मुंबई, 13 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट सध्या केपटाऊनमध्ये सुरू आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. केपटाऊन टेस्ट जिंकणारी टीम मालिका जिंकणार आहे. पहिल्या दिवसावर यजमान टीमनं वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी कमबॅक केले. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) 5 विकेट्समुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली. केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक खास प्रसंग घडला. आफ्रिकेच्या प्रत्येक विकेटनंतर भारतीय टीमचा उत्साह वाढत होता. बॉलर्स विशेष उत्साहात होते. त्यांचा उत्साह कमी होऊ नये याची खबरदारी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) घेत होता. विराट प्रत्येक चांगल्या बॉलनंतर टाळ्या वाजवत त्यांचा उत्साह वाढवत होता. विराट एवढ्यावरच थांबला नाही, त्याने डग आऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंना देखील टाळ्या वाजवण्याची सूचना केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मोहम्मद सिराज, ऋद्धीमान साहा आणि जयंत यादव हे खेळाडू डग आऊटमध्ये बसलेले आहेत. कॅप्टनने इशारा करताच ते जोराने टाळ्या वाजवतात. तर मैदानात मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा देखील टाळ्या वाजवत आहेत.
Kohli celebrates the wickets.. looks towards his team dug out and shouts 'Keep Clapping Boys.. Keep Clapping' and this follows..
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) January 12, 2022
This guy just creates an amazing atmosphere in the match.. pic.twitter.com/ens77zqg3M
केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने 42 रन देत 5 विकेट्स घेतल्या. बुमराहच्या भेदक बॉलिंगमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 13 रनची आघाडी घेतली. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 223 रन केले होते. त्याला उत्तर देताना आफ्रिकेची पहिली इनिंग 210 रनवर संपुष्टात आली. IPL 2022 : BCCI चा प्लॅन B, यजमानपदासाठी यूएई नाही तर ‘या’ 2 देशांची नावं आघाडीवर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 2 आऊट 57 इतका होता. विराट कोहली (Virat Kohli) 14 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 रनवर खेळत आहेत. टीम इंडियाकडे सध्या 70 रनची आघाडी आहे. तसंच आणखी 8 विकेट्स शिल्लक आहेत.