मुंबई, 23 डिसेंबर : आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये (IPL 2022) लखनऊ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम दाखल होणार आहेत. बीसीसीआयने लिलावाच्या माध्यमातून या दोन शहरांच्या टीमचे मालकी हक्क विकले आहेत. यापैकी अहमदाबादची फ्रॅन्चायझीची मालकी सीव्हीसी कॅपिटलने (CVC Capital) मिळवली आहे. सीव्हीसी ग्रुपचा संबंध ऑनलाईन सट्टाबाजार आणि जुगाराशी आढळल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या टीमला बीसीसीआय लवकरच लेटर ऑफ इंटेट देणार आहे, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेसनं’ दिले आहे. बीसीसीआयच्या तीन सदस्यील लीगल समितीनं या विषयावर या ग्रुपला क्लीनचीट दिली असून त्यामुळे या टीमचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कसा सुटला पेच? या वृत्तानुसार, ‘बीसीसीआयच्या महासभेत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सीव्हीसी कंपनीच्या संदर्भातील मालकी हक्काची माहिती देण्यात आली. यानुसार सीव्हीसीकडे युरोपीन आणि आशियाई असे दोन फंड आहेत. युरोपियन फंडचे कनेक्शन बेटींग कंपनीशी आहे, कारण युरोपमध्ये बेटींग कायदेशीर आहे. तर अहमदाबाद टीममध्ये कंपनीने आशियाई फंडातून गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा बेटींगशी संबंध नाही.’ सीव्हीसी कॅपिटलला क्लीनचीट देण्यासाठी बीसीसीआयला वेळ लागला आहे. यापूर्वी या दोन्ही टीमला ऑक्शपूर्वी ड्राफ्टच्या माध्यमातून खेळाडू निवडण्यासाठी 25 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत जानेवारीपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. विराट-गांगुली वादावर आफ्रिदीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला… कधी होणार IPL Auction? बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आयपीएलचा लिलाव पुढच्या वर्षी 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे. कोरोनामुळे स्थिती खराब झाली नाही तर लिलाव भारतामध्येच होईल. दोन दिवसांच्या या लिलावासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलचा लिलाव युएईमध्ये होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण बीसीसीआयची अशी कोणतीही योजना नाही. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे परदेश यात्रेर निर्बंध येऊ शकतात, त्यामुळे हा लिलाव भारतात करणं सोपं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.