मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट-गांगुली वादावर आफ्रिदीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विराट-गांगुली वादावर आफ्रिदीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्याच्या निर्णयावरील वाद अजूनही संपलेला नाही. आता या विषयावर पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्याच्या निर्णयावरील वाद अजूनही संपलेला नाही. जगभरातील क्रिकेटपटू त्यावर मत व्यक्त करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष  सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या विषयावर केलेला दावा विराटने फेटाळल्यानंतर या चर्चेला तोंड फुटलं आहे. आता या विषयावर पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने प्रतिक्रिया दिली आहे.

आफ्रिदीनं पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलवर बोलताना सांगितले की, 'या प्रकराची चांगल्या पद्धतीने हाताळणी करता आली असती. या प्रकरणात क्रिकेट बोर्डाची भूमिका खूप महत्त्वाची असते, असं माझं मत आहे. निवड समितीनं कोणतीही गोष्ट खेळाडूंना स्पष्टपणे सांगितली पाहिजे. त्यांनी खेळाडूंना भविष्यातील योजनांची तसेच त्यांच्याबद्दल असलेल्या मताची कल्पना देणे आवश्यक आहे. या गोष्टी मीडियातून समजल्या, तर अडचण होते. खेळाडू आणि क्रिकेट बोर्डामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे,' असे आफ्रिदीने स्पष्ट केले.

वेंगसरकर यांचीही टीका

माजी कॅप्टन आणि निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी (Dilip Vengsarkar) या प्रकरणात सौरव गांगुलीला सुनावले आहे. 'निवड समितीच्या वतीनं सौरव गांगुलीला बोलण्याची काहीही गरज नव्हती. तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. कॅप्टनच्या नियुक्तीबाबत निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बोलायला हवे होते. कॅप्टनची निवड करणे किंवा त्याला हटवणे हा निवड समितचा विषय आहे. ते गांगुलीचे कार्यक्षेत्र नाही.' असे वेंगसरकर यांनी म्हंटले आहे.

पीकेएलमध्ये आज 3 सामने, कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?

विराट कोहलीने टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर रोहित शर्माला वन-डे टीमचा कॅप्टन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, लिमिटेड ओव्हर्समधील दोन प्रकारात वेगवेगळे कॅप्टन असणे योग्य नव्हते, असे गांगुली यांनी सांगितले होते.

First published:

Tags: Shahid Afridi, Sourav ganguly, Virat kohli