मुंबई, 22 जानेवारी : आयपीएल स्पर्धेच्या आगामी सिझनपूर्वी (IPL 2022) बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यंदा 8 ऐवजी 10 टीम स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे सर्वच टीमची नव्याने रचना होणार आहे. बंगळुरूमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) सर्व टीमचे चित्र स्पष्ट होईल. त्यापूर्वी 10 टीमनी मिळून 33 खेळाडूंना या ऑक्शनपूर्वीच करारबद्ध केले आहे. जुन्या 8 टीमनी त्यांच्या 27 खेळाडूंची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या शहरांच्या टीमनं शुक्रवारी रात्री प्रत्येकी 3 खेळाडूंना लिलावापूर्वी करारबद्ध केल्याचे जाहीर केले आहे.
आयपीएलमधी सर्वात महागडी टीम असलेल्या लखनऊनं (Lucknow Team)
टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर केएल राहुलला (KL Rahul) 17 कोटींमध्ये खरेदी केले आहे. लखनऊनं राहुलसह ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस 9.2 (Marcus Stoinis) आणि अनकॅप भारतीय खेळाडू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांना 4 कोटींना करारबद्ध केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अहमदाबाद टीमचा (Ahmedabad Team) कॅप्टन असेल. अहमदाबादने अफगाणिस्तानचा स्टार बॉलर राशिद खानवरही (Rashid Khan) इतकेच पैसे खर्च करण्यात आले आहेत. शुभमन गिलला (Shubman Gill) 8 कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. गिल यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत होता. तर राशिद सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सदस्य होता.
IND vs SA : टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, टेस्टनंतर वनडे सीरिजमध्येही गुडघे टेकले
IPL 2022 Retention Full List:
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी ), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी).
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली (15 कोटी ), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी).
अहमदाबाद- हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी), शुभमन गिल (8 कोटी).
लखनऊ- केएल राहुल (17 कोटी), मार्कस स्टोइनिस (9.2 कोटी), रवी बिश्नोई (4 कोटी).
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिक नॉर्किया (6.5 कोटी).
चेन्नई सुपरकिंग्स- रविंद्र जडेजा (16 कोटी), महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड़ (6 कोटी).
सनरायझर्स हैदराबाद- केन विलियमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी).
कोलकाता नाइट राइडर्स-आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), सुनिल नरीन (6 कोटी).
राजस्थान रॉयल्स- संजू सैमनसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी), यशस्वी जैस्वाल (4 कोटी).
पंजाब किंग्ज - मयंक अग्रवाल (14 कोटी), अर्शदीप सिंग (4 कोटी).
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.