Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, टेस्टनंतर वनडे सीरिजमध्येही गुडघे टेकले

IND vs SA : टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, टेस्टनंतर वनडे सीरिजमध्येही गुडघे टेकले

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली टीम इंडियाची (India vs South Africa) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर आता भारताने वनडे सीरिजमध्येही (ODI Series) गुडघे टेकले आहेत.

    पार्ल, 21 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली टीम इंडियाची (India vs South Africa) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर आता भारताने वनडे सीरिजमध्येही (ODI Series) गुडघे टेकले आहेत. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 288 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 48.1 ओव्हरमध्ये पार केलं. जानेमन मलानने सर्वाधिक 91 रनची खेळी केली, तर क्विंटन डिकॉकने 78 रन केले. एडन मार्करम आणि रस्सी व्हॅन डर डुसेन प्रत्येकी 37 रनवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने 35 रन केले. भारताकडून बुमराह, चहल आणि ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 287 रन केले. केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची अर्धशतकं आणि शार्दुल ठाकूर-आर.अश्विन यांच्यात झालेल्या नाबाद 48 रनच्या पार्टनरशीपमुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. ठाकूरने 38 बॉलमध्ये नाबाद 40 तर अश्विनने 24 बॉलमध्ये 25 रनची नाबाद खेळी केली. पंतने 71 बॉलमध्ये 85 रन केले, यात 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. राहुलने 79 बॉलमध्ये 4 फोरच्या मदतीने 55 रन केल्या. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन आणि केएल राहुलच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली, पण 12 व्या ओव्हरला शिखर धवन 29 रनवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला विराट कोहली लगेच शून्य रनवर माघारी परतला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर राहुलने ऋषभ पंतच्या मदतीने भारताचा डाव सावरला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या