जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'या' 5 खेळाडूंवर लागणार 10 कोटींपेक्षा जास्त बोली, प्रत्येक जण आहे मॅच विनर

IPL 2022 : 'या' 5 खेळाडूंवर लागणार 10 कोटींपेक्षा जास्त बोली, प्रत्येक जण आहे मॅच विनर

IPL 2022 : 'या' 5 खेळाडूंवर लागणार 10 कोटींपेक्षा जास्त बोली, प्रत्येक जण आहे मॅच विनर

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या मेगा ऑक्शनला आता काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये हा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या मेगा ऑक्शनला आता काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये हा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 8 नाही तर 10 टीम खेळणार आहेत. या टीमनी एकूण 33 खेळाडूंना लिलावापूर्वीच करारबद्ध केले आहे. बाकी सर्व खेळाडूंची निवड ही लिलावातून होईल. यामधील 5 खेळाडूंना घेण्यासाठी सर्व फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस रंगणार असून त्याला 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे. श्रेयस अय्यर : श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) बेस प्राईज 2 कोटी आहे. तो यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडून आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. श्रेयसच्या कॅप्टनसीमध्ये दिल्लीनं आयपीएल 2020 मध्ये फायनल गाठली होती.  यंदा दिल्लीनं ऋषभ पंतला (Rishabh Pant) कॅप्टन करण्याचे ठरवल्यानं तो दिल्लीपासून वेगळा झाला. यंदा अनेक टीम त्याला कॅप्टन करण्याच्या विचारात आहेत. श्रेयसला टीममध्ये घेण्यासाठी आरसीबी, केकेआर आणि पंजाब किंग्ज यांच्यात चुरस असेल. डेव्हिड वॉर्नर : सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा माजी कॅप्टन असलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणारा विदेशी बॅटर आहे. त्याला मागील सिझनमध्ये हैदराबादनं कॅप्टन पदावरून हटवले होते. तसंच यंदा रिटेन केले नाही. वॉर्नरनं कॅप्टन म्हणून एक आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसंच ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्ड कपही जिंकून दिला आहे. वॉर्नरला यंदा मोठी किंमत मिळणार आहे. पॅट कमिन्स : ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) सध्या फॉर्मात आहे. त्याला यापूर्वी केकेआरनं 15.5 कोटींमध्ये खरेदी केले होते. नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये उपयुक्त बॅटर असल्याचं कमिन्सनं यापूर्वी दाखवून दिलं आहे. त्यामुळे अनेक टीमना तो हवा आहे. हार्दिक पांड्याने सोडले मौन, टीम इंडियात परत येण्याची जाहीर केली तारीख कागिसो रबाडा : भारताविरुद्ध नुकतीच झालेली  टेस्ट सीरिज (India vs South Africa) जिंकण्यात कागिसो रबाडाचा (Kagiso Rabada) मोठा वाटा होता.  रबाडाला यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) 4 कोटींना खरेदी केले होते. त्याचा फॉर्म आणि आयपीएल रेकॉर्ड पाहता तो देखील यंदा 10 कोटींपेक्षा जास्त कमाई करणार आहे. ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंडचा अनुभवी बॉलर ट्रेंट बोल्ट (Trent Bolt) गेल्या काही सिझनपासून मुंबई इंडियन्सकडे आहे. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये विकेट घेण्याची बोल्टची क्षमता आहे. टीममधील प्रमुख फास्ट बॉलर म्हणून त्याला खरेदी करण्यासाठी आयपीएल टीममध्ये यंदा स्पर्धा रंगणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात