मुंबई, 23 मार्च : आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी आता 3 दिवसांचाच कालवाधी उरला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) या मॅचनं आयपीएल स्पर्धेला सुरूवात होईल. या आयपीएलपूर्वी काही टीमच्या कॅप्टनमध्ये बदल झाला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) देखील यंदा नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. विराट कोहली (Virat Kohli) गेली काही वर्ष आरसीबीचा कॅप्टन होता. विराटनं मागील सिझननंतर आरसीबीची कॅप्टनसी सोडली. त्यानंतर आता फाफ ड्यू प्लेसिसची (Faf du Plessis) कॅप्टन म्हणून आरसीबीनं नियुक्ती केली आहे. आरसीबीनं फाफ ड्यू प्लेसिसला 7 कोटींंमध्ये खरेदी केले आहे. आरसीबीची पहिली मॅच 27 मार्चपासून पंजाब किंग्ज विरूद्ध होणार आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आर. अश्विननं (R. Ashwin) आरसीबी आणि फाफ ड्यू प्लेसिसवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अश्विननं विराट कोहली हा पुढील सिझनमध्ये आरसीबीचा कॅप्टन होऊ शकतो, असा दावा केला आहे. अश्विननं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, ‘ड्यूप्लेसिसचं आयपीएल करिअर शेवटच्या टप्प्यात आहे. तो दोन किंवा तीन वर्ष खेळू शकतो. आरसीबीनं त्याला कॅप्टन करून चांगला निर्णय घेतला आहे. फाफ खूप अनुभवी आहे. त्याच्या कॅप्टनसीवर महेंद्रसिंह धोनीचा प्रभाव असल्याचं त्यानं स्वत: मान्य केलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी कारवाई, प्रमुख खेळाडूवर घातली 2 मॅचची बंदी मला वाटतं की विराटनं गेल्या काही वर्षांमध्ये मोठा तणाव सहन केला आहे. त्याला हे वर्ष एका ब्रेक सारखे असेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर पुढच्या वर्षी त्याला पुन्हा कॅप्टन करू शकते, असा माझा अंदाज आहे.’ आरसीबीची पहिली लढत 27 मार्च रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध (RCB vs PBKS) होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.