मुंबई, 23 मार्च : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) त्यांच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. इसीबीनं टीमचा ओपनर जेसन रॉयवर (Jason Roy) खेळ भावनेला धक्का पोहचवल्याचा आरोप करत 2 आंतरराष्ट्रीय मॅचची बंदी घातली आहे. रॉयवर कोणत्या कारणासाठी कारवाई केली हे जाहीर केलेले नाही. रॉयने त्याची चूक मान्य केल्याची माहिती इसीबीनं दिली आहे. रॉयच्या वागणुकीमुळे क्रिकेट, इसीबी आणि त्याच्या स्वत:च्या प्रतिमेला धक्का बसल्याचं इसीबीनं स्पष्ट केलं आहे. जेसन रॉयवर 2 मॅचची बंदी घालण्यात आली असली तरी चांगल्या वागणुकीसाठी पुढील 12 महिने ही बंदी निलंबित करण्यात आली आहे. त्याला 2500 पौंड दंडही आकारण्यात आला आहे. रॉयनं 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानं आजवर 5 टेस्ट, 98 वन-डे आणि 58 टी20 इंटरनॅशनल खेळल्या आहेत. यामध्ये अनुक्रमे 187, 3658 आणि 1446 रन काढले आहेत. रॉयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 शतक झळकावली आहेत. आयपीएलमधून घेतली माघार जेसन रॉयची आयपीएल ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं निवड केली होती. त्यानं स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बायो-बबलचे कारण देत त्यामधून माघार घेतली. आयपीएल लिलावात विकला गेल्यानंतर जेसन रॉयने दुसऱ्यांदा माघार घेतली आहे. याआधी 2020 साली रॉयला दिल्ली कॅपिटल्सने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण वैयक्तिक कारणांमुळे त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. रॉय यंदा खेळला असता तर गुजरात टायटन्स त्याची चौथी आयपीएल टीम असती. IPL 2022 : रोहित शर्माला मोठा धक्का, पहिल्या मॅचमधून Surykumar Yadav out! याआधी तो गुजरात लायन्स, दिल्ल डेयरडेव्हिल्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. 2021 च्या लिलावात रॉय अनसोल्ड राहिला, पण ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्शला दुखापत झाल्यामुळे हैदराबादने त्याला टीममध्ये घेतलं. रॉयने 13 आयपीएल सामन्यांमध्ये 329 रन केले आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. यातलं एक अर्धशतक त्याने दिल्लीकडून तर दुसरं हैदराबादकडून केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.