मुंबई, 5 मे : सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर मॅच होणार आहे. आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केल्यानं दोन्ही टीमचा प्ले ऑफचा मार्ग सध्या खडतर बनला आहे. हैदराबादची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीची टीम सातव्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी बॅटर डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) असेल. वॉर्नर मागील सिझनपर्यंत सनरायझर्स हैदराबादच्या टीममध्ये होता. वॉर्नरच्याच कॅप्टनसीमध्ये या टीमनं 2016 सााली आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. हैदराबादचा सर्वात यशस्वी बॅटर असलेल्या वॉर्नरसाठी मागील सिझन अतिशय खराब गेला होता. खराब फॉर्ममुळे त्याला कॅप्टनपदावरून तसंच टीममधून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याला हैदराबादनं रिटेन न करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरनही सनरायझर्स हैदराबादच्या मॅनेजमेंटवर नाराजी व्यक्त केली होती. यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सनं खरेदी केले. त्यानंतर वॉर्नर पहिल्यांदाच सनरायझर्स विरूद्ध मैदानात उतरणार आहे. वॉर्नर सध्या फॉर्मात असून त्यानं या सिझनमधील सात मॅचमध्ये 3 अर्धशतक झळकावली आहेत. पृथ्वी शॉ सोबतची त्याची ओपनिंग जोडी चांगलीच धोकायदक आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये होणाऱ्या मॅचकडं वॉर्नर विरूद्ध सनरायझर्स असं पाहिलं जात आहे. मॅराडोनाच्या Hand of God जर्सीचा रेकॉर्डब्रेक लिलाव, किंमत वाचून व्हाल थक्क! काय म्हणाला वॉर्नर? वॉर्नरनं मात्र या मॅचला अवास्तव महत्त्व देणं टाळलं आहे. या मॅचपूर्वी बोलताना तो म्हणाला की, ‘माझ्यासाठी अन्य कोणत्याही मॅचप्रमाणेच मॅच आहे. मी माझं काम करणार आहे. सध्या आम्ही ज्या पोझिशनवर आहोत त्यानुसार प्ले ऑफ गाठण्यासाठी आम्हाला प्रत्येक मॅच जिंकायची आहे. आगामी काळात आम्हाला तगड्या टीमचा सामना करायचा आहे. सनरायझर्स हैदराबादचा आम्ही पराभव केल्यास आमची परिस्थिती चांगली होईल.’ दिल्ली कॅपिटल्सची या स्पर्धेत कुठे चूक झाली ते देखील वॉर्नरनं यावेळी सांगितलं. ‘आमच्या मॅचचे निकाल पाहिले तर आम्हाला मोठ्या स्कोअरचा यशस्वी पाठलाग करण्यात अपयश आल्याचं तुम्हाला दिसेल. आम्ही त्या टार्गेटच्या जवळ पोहचलो होतो. पण, त्यानंतरही अगदी थोडक्यात आमचा पराभव झाला. हे खूप त्रासदायक आहे.’ असे वॉर्नर यावेळी म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.