मुंबई, 5 मे : महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतर कायम आहे. फुटबॉल विश्वातील अर्जेंटीनाच्या जादुगाराचे जगभरात फॅन्स आहेत. मॅराडोनाच्या खेळाप्रमाणेच त्याच्या प्रत्येक वस्तूवर त्यांचं जीवापाड प्रेम आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या लिलावात त्याचा प्रत्यय आला. मॅराडोना यांनी 1986 च्या वर्ल्ड कपमध्ये घातलेल्या एका जर्सीची तब्बल 7.1 मिलियन पौंड (जवळपास 71 कोटी) रूपयांना विक्री झाली.
जर्सीचं ऐतिहासिक महत्त्व
मेक्सिकोमध्ये 1986 साली झालेला फुटबॉल वर्ल्ड कप हा मॅराडोनाच्या फुटबॉल कारकिर्दीमधील सोनेरी कालखंड आहे. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये मॅराडोनाच्या हाताला लागून बॉल गोलपोस्टमध्ये गेला होता. मैदानातील रेफ्रींना ते न दिसल्यानं त्यांनी तो गोल वैध असल्याचा निर्णय दिला. या वादग्रस्त निर्णयाचे गेल्या अनेक वर्षांपासून फुटबॉल विश्वामध्ये पडसाद उमटत आहेत. विशेषत: ब्रिटीश माध्यमांनी या गोलमुळे मॅराडोनावर नेहमीच टीका केली आहे.
मॅराडोना यांनी त्या बॉलला देवाचा हात लागल्याचं (Hand of God) सांगितलं होतं. त्यामुळे फुटबॉल विश्वात हा गोल 'हँड ऑफ गॉड' म्हणून प्रसिद्ध आहे. त्या वर्ल्ड कपपूर्वी ब्रिटन आणि अर्जेंटीना यांच्यात फॉकलंड बेटामुळे युद्ध झाले होते. त्या तणावाची पार्श्वभूमी देखील त्या मॅचला होती. अर्जेंटीनानं मॅराडोनाच्या 'हँड ऑफ गॉड' मुळे ती मॅच 2-1 अशी जिंकली. त्यानंतर पुढे वर्ल्ड कप विजेतेपदही पटकावले होते.
IPL 2022 : भर मैदानात मुलीनं गुडघ्यात वाकून बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, पाहा VIDEO
इंग्लंड विरूद्धच्याच मॅचमध्ये मॅराडोना यानं केलेला दुसऱ्या गोलची विसाव्या शतकातील सर्वोत्तम गोल म्हणून 2002 साली निव़ झाली होती. या मॅचनंतर मॅराडोनानं इंग्लंडचा मिड फिल्डर स्टीव्ह हॉजसोबत जर्सीची अदला-बदली करण्यात आली होती. ही जर्सी गेली 20 वर्ष मँचेस्टरमधील इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संग्रहालयात होती. त्या जर्सीचा आता लिलाव करण्यात आला आहे. ही जर्सी खरेदी केलेल्या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.