मुंबई, 16 मार्च : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. हा सिझन सुरू होण्यापूर्वी तीन आयपीएल टीमसाठी दिलासादायक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी (South Africa Cricketers) पहिल्या मॅचपासून आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश (South Africa vs Bangladesh) यांच्यात 18 मार्चपासून टेस्ट सीरिज सुरू होत आहे. त्यामुळे यांच्या सहभागाबात प्रश्न निर्माण झाला होता. पण आफ्रिकेच्या खेळाडूंनी या सीरिजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
'इएसपीएन क्रिकइन्फो' नं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल टीममध्ये निवड झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची टीम आता प्रमुख बॉलर्सशिवाय बांगलादेश विरूद्धच्या सीरिजमध्ये खेळणार आहे. या खेळाडूंची टीमचे कोच मार्क बाऊचर यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये दक्षिण आफ्रिका बोर्डाला अपयश आले.
क्रिकेट साऊथ आफ्रिकेचा बीसीसीआयशी यापूर्वी करार झाला आहे. या करारानुसार आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी आफ्रिका बोर्डाकडून खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले जाते. पण, यंदा आयपीएल सिझनची विंडो मोठी आहे. आम्हालाही आमचा प्राधान्यक्रम पूर्ण करायचा आहे, अशी माहिती आफ्रिका बोर्डातील सूत्रांनी 'क्रिकइन्फो' ला दिली आहे.
Women's World Cup, IND vs ENG : कॅप्टन मिताली पुन्हा फ्लॉप, टीम इंडियाला 3 झटपट धक्के
कोणत्या टीमना फायदा?
दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा (पंजाब किंग्ज), लुंगी एनगिडी ( दिल्ली कॅपिटल्स) आणि मार्को जेनसन (सनरायझर्स हैदराबाद) हे तीन प्रमुख खेळाडू टेस्ट टीमचे सदस्य आहेत. ते आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्यानं बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आफ्रिकेचे प्रमुख बॉलर्स नसतील. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्खिया अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे अद्याप अनिश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Ipl 2022, South africa