मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IIT, IIM मध्ये न जाता क्रिकेटच्या मैदानात उतरला, IPL गाजवल्यानंतर आता थेट टीम इंडियात निवड

IIT, IIM मध्ये न जाता क्रिकेटच्या मैदानात उतरला, IPL गाजवल्यानंतर आता थेट टीम इंडियात निवड

टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियात (Team India) मोठे बदल करण्यात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs New Zealand) ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियात (Team India) मोठे बदल करण्यात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs New Zealand) ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियात (Team India) मोठे बदल करण्यात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs New Zealand) ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 9 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियात (Team India) मोठे बदल करण्यात आले. टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या तब्बल 9 जणांची न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) टी-20 सीरिजसाठी निवड करण्यात आली नाही, यातल्या काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, तर काहींचा पत्ता कट करण्यात आला. विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच विराट कोहलीला टी-20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इंग्लंड दौऱ्यापासून क्रिकेट खेळत असलेल्या जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद आणि शार्दुल ठाकूर यांनाही आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांची टीममधून गच्छंती झाली आहे.

व्यंकटेश अय्यरचं टीममध्ये आगमन

आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे. व्यंकटेश अय्यरने हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) जागा घेतली आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये व्यंकटेश अय्यरने केकेआरला (KKR) आयपीएल फायनलपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका निभावली. अय्यरने आयपीएल 2021 मध्ये केकेआरकडून खेळताना 10 मॅचमध्ये 370 रन केले आणि 3 विकेट मिळवल्या होत्या.

आयपीएलदरम्यान व्यंकटेश अय्यरने आपण क्रिकेटमध्ये करियर केलं नसतं तर आयआयटी किंवा आयआयएममध्ये असतो, असं सांगितलं होतं. 'मी हुशार विद्यार्थी होतो. दक्षिण भारतातल्या कुटुंबामध्ये खेळ हा दुसरा पर्याय असतो. आई-वडील मुलांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. माझ्याकडे आईने मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं,' असं अय्यर म्हणाला.

मध्य प्रदेशकडून ओपनिंग करणाऱ्या 26 वर्षांच्या व्यंकटेशने इतर मुलांप्रमाणेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकइन्फोशी बोलताना व्यंकटेश म्हणाला, 'मी घरामध्ये पुस्तकांमध्येच असायचो, तेव्हा आई मला बाहेर खेळायला पाठवायची'.

सीए आणि बीकॉम डिग्री मिळवण्यासाठी अय्यरने एडमिशनही घेतली होती. 2016 साली त्याने इंटरमीडिएट परीक्षेमध्येही टॉप केलं होतं. त्यावेळी अय्यरकडे क्रिकेट किंवा सीए यापैकी एकच पर्याय होता. सीए फायनल परीक्षा देणं म्हणजे क्रिकेट सोडणं किंवा काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेणं, पण त्याने क्रिकेट निवडलं.

व्यंकटेश अय्यरने आधी मध्य प्रदेशच्या सीनियर टीमकडून टी-20 आणि वनडे टीममधून पदार्पण केलं. याशिवाय तो अंडर-23 टीमा कर्णधारही होता. 'मी सीए सोडून एमबीए फायनान्स करण्याचं ठरवलं. एन्ट्रन्स एक्झाममध्ये मला चांगले मार्क मिळाले होते. तसंच चांगल्या कॉलेजमध्येही एडमिशन मिळाली होती. माझे शिक्षक चांगले होते आणि त्यांना क्रिकेट आवडायचं. मी चांगला खेळत आहे हे त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी मला लेक्चरला येण्यापासून सूट दिली, तसंच नोट्सही दिल्या,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली.

'क्रिकेट आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं मला फार कठीण गेलं नाही. मी कायमच हुशार विद्यार्थी होतो. मी क्रिकेटपटू नसतो तर आयआयटी किंवा आयआयएमध्ये असतो. 2018 साली मला बँगलोरमध्ये नोकरीही मिळाली होती, पण क्रिकेटसाठी मी ती नोकरी सोडली,' असं वक्तव्य अय्यरने केलं.

First published:
top videos

    Tags: Team india