Home /News /sport /

IPL 2022 : गावसकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद, कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी

IPL 2022 : गावसकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद, कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी

सुनिल गावसकर यांनी (Sunil Gavaskar) राजस्थान रॉयल्सनं विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यातील मॅचच्या दरम्यान केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

    मुंबई, 21 मे : टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदरानं घेतलं जातं. गावसकर निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन तसंच सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड होता. निवृत्तीनंतर गेल्या तीन दशकांपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॉमेंट्रेटर म्हणून प्रसिद्ध आहेत. नेहमी मोजून-मापून बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावसकर यांनी राजस्थान रॉयल्सनं विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यातील मॅचच्या दरम्यान केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला असून त्यांनी कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात दुसऱ्यांदा बॅटींग करणारी राजस्थानची टीम चांगल्या सुरूवातीनंतर संकटात सापडली. अखेर आर. अश्विननं केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थाननं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. राजस्थानच्या इनिंगच्या दरम्यान गावसकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा क्रिकेट फॅन्स करत आहेत. राजस्थानच्या शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) 15 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला. त्यावेळी गावसकर मॅचची इंग्रजी कॉमेंट्री करत होते. त्यावेळी गावसकर यांनी, 'हेटमायरच्या बायकोची नुकतीच डिलिव्हरी झाली. हेटमायर राजस्थानसाठी  डिलिव्हरी करणार का? हा प्रश्न विचारला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अनुष्का शर्माशी झाला होता वाद गावसकर यांनी यापूर्वी आयपीएल 2022 मधील कॉमेंट्रीच्या दरम्यान  विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या खासगी आयुष्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलो विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्या सामन्यातील विराटचा खेळ पाहून  “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं होतं. त्यावर अनुष्का शर्मा नाराज झाली होती. IPL 2022 : रोहितच्या वक्तव्यानं वाढलं RCB चं टेन्शन, मुंबईच्या हाती आहे भवितव्य 'खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?' असा प्रश्न अनुष्कानं केला होता. त्यानंतर गावसकर यांना पुढील सामन्यात कॉमेंट्री करताना या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, Rajasthan Royals, Sunil gavaskar

    पुढील बातम्या