मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

IPL 2022 : अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

राजस्थानच्या या विजयात आर. अश्विननं (R. Ashwin) महत्त्वाचे योगदान दिले. अश्विननं 23 बॉलमध्ये नाबाद 40 रन काढले. त्याचबरोबर 1 विकेटही घेतली.

राजस्थानच्या या विजयात आर. अश्विननं (R. Ashwin) महत्त्वाचे योगदान दिले. अश्विननं 23 बॉलमध्ये नाबाद 40 रन काढले. त्याचबरोबर 1 विकेटही घेतली.

राजस्थानच्या या विजयात आर. अश्विननं (R. Ashwin) महत्त्वाचे योगदान दिले. अश्विननं 23 बॉलमध्ये नाबाद 40 रन काढले. त्याचबरोबर 1 विकेटही घेतली.

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (RR vs CSK) 5 विकेट्सनं पराभव केला. राजस्थानच्या या विजयात आर. अश्विननं (R. Ashwin) महत्त्वाचे योगदान दिले. अश्विननं 23 बॉलमध्ये नाबाद 40 रन काढले. त्याचबरोबर 1 विकेटही घेतली. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

चेन्नईनं दिलेल्या 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या सुरूवातीनंतर राजस्थानची बॅटींग कोसळली. 17 व्या ओव्हरमध्ये राजस्थानची अवस्था 5 आऊट 112 अशी झाली होती. त्यावेळी अश्विननं मॅचची सुत्रं हाती घेत आक्रमक 40 रन काढले. त्यानं या खेळीत 2 फोर आणि 3 सिक्स लगावले. तसंच त्याचा स्ट्राईक रेट 173.91 इतका होता.

अश्विननं या विजयानंतर सांगितलं की, 'आजची मॅच जिंकणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो. हा लीग स्टेजचा खूप चांगला शेवट आहे. या स्पर्धेच्यापूर्वीच टीम मॅनेजमेंटनं माझी भूमिका स्पष्ट केली होती. मला अनेक गोष्टींवर काम करायचं होतं. मला माझा रोल माहिती होता. मला खेळ चांगला समजतो, असं माझं मत आहे. त्यांनी (मॅनेजमेंट) देखील मला योग्य पद्धतीनं समजून घेतलं.  मला बेस्ट गेम खेळण्याची इच्छा आहे. 'प्ले ऑफ' मध्ये जागा मिळाल्यानं मी खूप खूश आहे. आज मी माझ्यातील डेव्हिड वॉर्नरला जागं केलंय,' असं अश्विननं शेवटी हसत म्हणाला.

IPL 2022 : चेन्नईच्या पराभवानंतरही CSK फॅन खूश, धोनीनं दिली Good News

राजस्थान रॉयल्सचे या विजयासह 18 पॉईंट्स झाले. राजस्थान आणि लखनऊ यांचे पॉईंट्स सारखे असले तरी रनरेटच्या आधारावर राजस्थाननं दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता क्वालिफायर 1 मध्ये त्यांची मॅच गुजरात टायटन्स विरूद्ध होईल. क्वालिफायर एकमध्ये पराभूत झालेल्या टीमला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळते. त्यामुळे आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकात येण्याला मोठं महत्त्व आहे.

First published:
top videos

    Tags: Csk, Ipl 2022, R ashwin, Rajasthan Royals